Maharashtra Weather : राज्यात गारठा कायम, पण किमान तापमानात वाढ होणार, IMD चा अंदाज

Maharashtra Weather IMD News : महाराष्ट्रात गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण तरी किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.
Maharashtra Weather Update: थंडीचा कडाका वाढला, विदर्भातील तापमान १० अंशावर; राज्यात इतर ठिकाणी काय परिस्थिती?
Maharashtra Weather UpdateSaam tv
Published On

Maharashtra Weather Update News in Marathi: उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने यंदाच्या हंगामात सपाट भूभागावर तापमान प्रथमच शून्य अंशाच्या खाली घसरला आहे. महाराष्ट्रातही गारठा कायम असून धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यात नीचांकी ६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात गारठा कायम राहणार असला, तरी किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

लक्षद्वीप आणि मालदीव परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दक्षिण अंदमान समुद्रात आज चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार असून, सोमवारपर्यंत या भागात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. यातच पश्‍चिमी चक्रावात आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका अधिकच वाढला आहे. शनिवारी पंजाबच्या 'अदमपूर' येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील नीचांकी उणे ०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Maharashtra Weather Update: थंडीचा कडाका वाढला, विदर्भातील तापमान १० अंशावर; राज्यात इतर ठिकाणी काय परिस्थिती?
Nanded : ठाकरे सेनेच्या शहर प्रमुखांचे अपहरण, पोलिसांनी तासाच्या आत केली सुटका

मध्य, पश्चिम (महाराष्ट्रसह) आणि पूर्व भारतात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकण्याची व हळूहळू कमजोर होण्याची शक्यता आहे. 14 डिसेंबरपासून वाऱ्याच्या स्वरूपात बदल होण्यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांचा अडथळा येण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्पातून ओलाव्याचा शिरकाव होऊ शकतो. पुन्हा, 15 डिसेंबरपर्यंत बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील एका आठवड्यासाठी रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update: थंडीचा कडाका वाढला, विदर्भातील तापमान १० अंशावर; राज्यात इतर ठिकाणी काय परिस्थिती?
Ajit Pawar- Sharad Pawar: काका- पुतण्या एकत्र येणार? पवार कुटुंबातील कटुता कमी होणार?

महाराष्ट्रात (पुण्यासह), रात्रीच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता नाही. वाऱ्याच्या स्वरूपात बदल झाल्यामुळे उत्तरेकडील वारे 14 डिसेंबरपासून अडवले जाऊ शकतात. त्याच वेळी, राज्याच्या दक्षिणेकडील भागातून ओलाव्याचा शिरकाव होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील एका आठवड्यात रात्रीच्या तापमानात हळूहळू वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com