Ajit Pawar- Sharad Pawar: काका- पुतण्या एकत्र येणार? पवार कुटुंबातील कटुता कमी होणार?

Ajit Pawar- Sharad Pawar Will Come Together: राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबात फूट पडली होती. त्यातच अजित पवारांनी यंदा दिवाळी पाडवाही स्वतंत्र साजरा केला. मात्र आता पवार कुटुंब एकत्र येण्याची चर्चा सुरु झालीय... एवढंच नाही तर त्याचे संकेत खुद्द पवार कुटुंबातूनच दिले आहेत.याच काका-पुतण्या एकत्र येण्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट.

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

अजित पवारांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवारांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या. त्यातच आता रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांनी पवार कुटुंब एकत्र येण्याविषयी सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे काका-पुतण्या एकत्र येण्याविषयीच्या चर्चांना आणखीच बळ मिळालंय. सुनंदा पवारांच्या विधानाचं अजित पवारांच्या पक्षाने स्वागत केलंय.. मात्र रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि अमोल कोल्हेंना काका-पुतण्यानं एकत्र यावं, असं वाटतं का? असा खोचक सवालही केलाय.. तर आमच्यात दोन मतप्रवाह नसल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय.

विधानसभेच्या निकालानंतर शरद पवारांनी अजित पवारांचं कौतूक केलं होतं. तर दिल्लीतील भेटीनंतर युगेंद्र पवारांनाही पुढील पाडवा एकत्र साजरा केला जाण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निर्माण झालेल्या कौटुंबिक कटुतेसोबत राजकीय कटुताही मिटणार का? आणि शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? याची उत्सुकता लागलीय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com