
लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिला विचारत होत्या. एप्रिल महिना संपला तरीही अद्याप पैसे दिले नाही. दरम्यान, कालपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेत अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावतर महिलांना एप्रिलचे १५०० रुपये देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, कालपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपये तर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ५०० रुपये दिले जात आहे.
एप्रिल महिना संपण्याआधी पैसे दिले जाणार- आदिती तटकरे
मध्यंतरी आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी देणार याबाबत मोठ वक्तव्य केलं होतं. एप्रिल महिना संपण्यापूर्वी महिलांच्या खात्यात पैसे दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यानंतर अक्षय्य तृतीयेला महिलांच्या खात्यात १५०० रुपये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.
या लाडक्या बहिणींना मिळणार फक्त ५०० रुपये
लाडकी बहीण योजनेत काही महिलांना १५०० रुपये तर काही महिलांना ५०० रुपये दिले जाणार आहेत. ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. तसेच नमो शेतकरी योजनेत महिलांना १००० रुपये दिले जातात. त्यामुळे उर्वरित ५०० रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत.
या महिलांना मिळणार नाहीत पैसे (These Women Will Not get Installment)
लाडकी बहीण योजनेत फक्त लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचे निकषात पात्र असेल त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. या योजनेची लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. महिला सरकारी नोकरीत कार्यरत नसावी. याचसोबत महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन नसावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.