Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडकीचा लाभ घेणाऱ्यांपैकी ८३ टक्के महिला विवाहित, तर फक्त ४.७ टक्के विधवा, आकडेवारी आली समोर

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत सर्वाधिक लाभार्थी महिला या पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ८३ टक्के महिला विवाहीत आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

योजनेतील ८३ टक्के महिला विवाहीत

सर्वाधिक लाभार्थी महिला पुणे जिल्ह्यातून

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेत गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत जवळपास अडीच कोटी महिलांचे अर्ज मंजुर झाले होते. सुरुवातीला अडीच कोटी लाभार्थी होत्या. त्यानंतर पडताळणीत अपात्र ठरल्यानंतर ही संख्या कमी झाली. दरम्यान, आता या योजनेतील महिलांची आकडेवारी समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेची आकडेवारी

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सुरुवातीला जेव्हा २.५ कोटी महिलांना लाभ मिळत होता त्यातील ८३ टक्के महिला या विवाहित होत्या. ११.८ टक्के महिला अविवाहीत होत्या.तर ज्या महिलांच्या नवऱ्याचे निधन झाले आहे त्यांची संख्या ४.७ टक्के आहे. घटस्फोटीत महिलांची संख्या १ टक्क्यापेक्षादेखील कमी आहे. या महिला ०.३ टक्के आहेत.

लाडकी बहीण योजनेत ३० ते ३९ वयोगटातील सर्वाधिक महिला लाभ घेत आहे. या महिलांची संख्या २९ टक्के आहे. २१ ते २९ वयोगटातील महिलांची संख्या २५.५ टक्के आहे. ४० ते ४९ वयोगटातील महिलांची संख्या २३.६ टक्के आहे. २१ ते ३९ या वयोगटातील महिलांची संख्या ७८ टक्के आहे. ६० ते ६५ वयोगटातील महिलांची संख्या फक्त ५ टक्के आहे.

लाडकी बहीण योजनेच्या सर्वाधिक लाभार्थी या पुणे जिल्ह्यातील आहेत. यानंतर नाशिक आणि अहिल्यानगरमधील सर्वाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात कमी महिला योजनेचा लाभ घेत आहेत. विदर्भातील गडचिरोलीमधील सर्वाधिक कमी महिला योजनेचा लाभ घेत आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय? (Ladki Bahin Yojana Eligibility)

लाडकी बहीण योजनेतून १ कोटींपेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळण्यात आले आहे. यामध्ये फक्त २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबातील फक्त २ महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. यातील एक विवाहित आणि १ अविवाहित महिला असावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT