Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत अजूनही अर्ज करता येणार का? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Ladki Bahin Yojana Application Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना अजूनही योजनेत अर्ज करता येणार का असा प्रश्न आता विचारला जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी बहीण योजना सुरु होऊन १० महिने पूर्ण होतील. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. लवकरच २१०० रुपयेदेखील दिले जातील, असं आश्वासन महायुती सरकारने दिले आहे. या योजनेत आतापर्यंत अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला आहे.दरम्यान, या योजनेत अजूनही अर्ज करता येणार का? जर आतापासून या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावे? असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत.

अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार का?

लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) अर्ज करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. जून महिन्यात ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेत सुरुवातीला अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ दिली होती. त्यानंतर अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली. महिलांना १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करण्यास सांगितले. यानंतर योजनेसाठीही अर्जप्रक्रिया बंद झाली. आता या योजनेत अर्ज करता येणार का असा प्रश्न महिला विचारत आहे.

सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करता येणार नाहीये. मात्र, भविष्यात जर सरकारने याबाबत कोणता निर्णय घेतला तर कदाचित लाभ न मिळालेल्या महिला अर्ज करु शकतात. मात्र, सरकारने याबाबत कोणताही निर्णय किंवा चर्चा केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी महिलांना या योजनेत आता अर्ज करता येणार नाही. मात्र, सरकार कदाचित याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतो. याबाबत अधिकृत माहित समोर आलेली नाही.

एप्रिलच्या हप्त्याची अपडेट (Ladki Bahin Yojana April Installment)

लाडक्या बहि‍णींना आता एप्रिलचा हप्ता कधी येणार याची उत्सुकता लागली आहे. लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कदाचित शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये येऊ शकतो. गेल्या अनेक महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात हप्ता जमा केला जात आहे. त्यामुळे महिलांना १५०० रुपये कधी येणार याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT