कावळ्याला वाटलं विजय आपलाच! पण शेवटच्या क्षणी गिधाडाने डाव पलटला; नेमकं काय घडलं?

Nashik City Bird Election Results 2026: आजवर तुम्ही लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहिल्य़ा आहेत...मात्र आम्ही तुम्हाला नाशिकमध्ये रंगलेली एक वेगळीच निवडणूक दाखवणार आहोत..जिची चर्चा संपूर्ण राज्यात रंगलीय...काय आहे ही निवडणूक ? आणि कोण जिंकलंय ही निवडणूक ? पाहूयात हा रिपोर्ट....
NASHIK UNIQUE ELECTION
NASHIK UNIQUE ELECTIONsaam tv
Published On: 

आतापर्यंत तुम्ही लोकसभा, विधानसभापासनं ती पार ग्रामपंचायतीच्या निवडणुका बघितल्या असत्याल. पण एक अशी निवडणूक झालीय त्यात थेट गिधाडानं बाजी मारलीय. ती बी थोड्या थोडक्या नाय तर 958 मतांनी गिधाडानं गुलाल उधळलाय. अन् पराभूत केलंय कुणाला तर थेट कावळ्याला...

त्याचं झालं असं नाशिकच्या एका सामाजिक संस्थेनं शहराचा मानपक्षी कोण ठरवायचा यासाठी इलेक्शन घियाचं ठरवलं. अन् मैदानात उतरलं दोन उमेदवार एक म्हणजी गिधाड काका अन् दुसरा कावळोबा शेट. या दोन दिग्गजांसाठी 3,032 मतदारांनी मतदान केलं. तसं पाहिलं तर नाशकांत सुरुवातीला कावळ्याची जास्तच क्रेझ हुती. पण अखेरच्या क्षणात गिधाडानं डाव पलटत जोरदार मुसंडी मारत 1995 मतं मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवलं. अन् हरकेल्या कावळ्याचं तोंड पार हिरमसुलं . कावळोबाला मिळाली 1035 मतं अन् गिधाडानं 958 मतांनी विजयाचं काडकं पाडलं...

कसंय राजकारण म्हटलं की युत्या आघाड्या आल्या... पैशांचा पाऊस अन् भावनेचा खेळ आला.. पण या निवडणुकीत नो नोट ओन्ली वोट हीच गणित होतं... अत्यंत पारदर्शक लोकशाही पद्धतीने निकाल लागला. किमान या पक्षांकडून तरी फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनी काय तरी शिकावं येवढंच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.