PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना मिळतायत ६००० रुपये; पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

PM Kisan Yojana Registration Process: पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. या योजनेसाठी अर्ज कसा करावा ते जाणून घ्या.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. शेतीच्या कामांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी ही मदत दिली जाते. या योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी ६००० रुपयांची मदत केली जाते. या योजनेत तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात.

पीएम किसान योजनेत आतापर्यंत १९ हप्ते वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान, लवकरच २०वा हप्ता दिला जाणार आहे. या योजनेत शेतकरी अजूनही लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? योजनेसाठी अर्ज कसा करावा? याबाबत संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा १९वा हप्ता जमा; या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये; तुम्ही आहात का? जाणून घ्या

पीएम किसान योजनेसाठी पात्रता

लहान, गरीब कुटुंबातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे शेतीयोग्य जमीन असावी.

शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमिनीच्या नोंदीमध्ये नोंदवलेले असावे.

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर लिंक असावा.

पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा? (How To Apply For PM Kisan Yojana)

जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

ऑनलाइन प्रोसेस

  • सर्वप्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर जावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला होमपेजवर दिलेल्या न्यू फार्मर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचे आहे. यानंतर १२ अंकी आधार नंबर टाकायचा आहे.

तुम्ही मोबाईल नंबर टाकूनदेखील ऑनलाइन अर्ज करु शकतात.

  • सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे.

  • यानंतर राज्य निवडायचे आहे. तुमच्या फोनवर ओटीपी येईल.

  • यानंतर आधार कार्ड, पासबुक हे कागदपत्र अपलोड करा.

  • यानंतर फॉर्म सबमिट करा. तुमची प्रक्रिया पूर्ण होईल.

PM Kisan Yojana
SBI Scheme: स्टेट बँकेची ४०० दिवसांची खास योजना! मिळणार भरघोस परतावा; गुंतवणुकीसाठी उरले फक्त ४ दिवस

ऑफलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेस (Offline Registration process)

तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे.

अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. तुम्हाला कागदपत्रे वेरिफाय करायची आहेत.

अधिकारी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल. त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पती-पत्नीलाही लाभ मिळणार? पुढचा हप्ता कधी जमा होणार? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com