
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आ.कर विभागात स्टेनोग्राफर ग्रेड II, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना खूप दिवसांआधी जाहीर करण्यात आली होती.
आयकर विभागातील या नोकरीसाठी (Income Tax Recruitment)अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल आहे. त्यामुळे तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी फक्त ३ दिवस उरले आहेत. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
आयकर विभागात एकूण ५६ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेनोग्राफर ग्रेड II साठी २ जागा रिक्त आहे. टॅक्स असिस्टंट पदासाठी २८ जागा रिक्त आहेत. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी २६ जागा रिक्त आहेत.
स्टेनोग्राफर आणि टॅक्स असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे असावी.मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असावी.
स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार १२वी पास असणे गरजेचे आहे. टॅक्स असिस्टंट पदासाठी उमेदवाराने ग्रॅज्युएट करणे गरजेचे आहे. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास केलेली असावी.
स्टेनोग्राफर आणि टॅक्स असिस्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला २५,५००, ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी १८००० ते ५६,९०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.
१२वी पास ते ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. सरकारी विभागात नोकरी करायची संधी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला चांगला अनुभव मिळणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस पगारदेखील मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.