Government Job: खुशखबर! वनविभागात सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पात्रता अन् अर्ज कसा करावा?

Forest Department Recruitment 2025: वनविभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. वनविभागात विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
Forest Department Recruitment
Forest Department RecruitmentSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र वनविभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकतात.

Forest Department Recruitment
IOCL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी, इंडियन ऑइलमध्ये भरती, २०० रिक्त जागा, अर्ज कसा करावा?

महाराष्ट्र शासन, उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव विभागाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रकल्प सल्लागार, कनिष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ अशा विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. प्रकल्प सल्लागार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने M.Sc Life Science मध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. ज्युनिअर रिसर्च बायोलॉजिस्ट पदासाठी उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

एकूण ५ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. अकोला, अमरावती येथे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने पाठवावे.

Forest Department Recruitment
NCRTC Recruitment: इंजिनियर झालात? सरकारी नोकरीची संधी; NCRTC मध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी मुलाखत ११ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी तुम्हाला सकाळी ११ वाजता विभागीय वनअधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा यांचे कार्यालय टिंबर डेपो रोड, परतवाडा, अचलपूर येथे उपस्थित राहायचे आहे.

या नोकरीसाठी तुम्ही dcf.akot@yahoo.com/ dyfsipna@gmail.com येथे पाठवायचा आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना १५००० ते ३५००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Forest Department Recruitment
Indian Navy Job: १०वी, १२वी पास तरुणांसाठी नौदलात नोकरीची संधी; या पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com