IOCL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी, इंडियन ऑइलमध्ये भरती, २०० रिक्त जागा, अर्ज कसा करावा?

Indian Oil Recruitment 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
IOCL Recruitment
IOCL RecruitmentSaam Tv
Published On

तुम्ही १२वी पास आहात किंवा नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय? तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. इंडियन ऑइलमध्ये २०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १२वी पास ते ग्रॅज्युएट पास उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही iocl.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (Indian Oil Recruitment)

IOCL Recruitment
SBI Jobs Recuritment : एसबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळवा नोकरी; कसा कराल अर्ज? वाचा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमधील ही भरती मार्केटिंग डिवीजनमध्ये होणार आहे. नॉर्थन रीजनमध्ये ही भरती केली जाणार आहे. याबाबत तुम्ही अधिसूचना वाचावी.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमधील ही भरती दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, चंदीगढ, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी होणार आहे. ही भरती टेक्नीशियन, ग्रॅज्युएट आणि ट्रेड अप्रेंटिस पदासाठी होणार आहे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही फील्डसाठी ही भरती केली जाणार आहे. (IOCL Recruitment)

इंडियन ऑइलमधील अप्रेंटिसशिपमध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. टेक्नीशियन पदासाठी डिप्लोमा केलेला असावा. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी आयटीआय पास उमेदवार असावे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी बीबीए, बीए, बी.कॉम, बी.एससी ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करावेत. या नोकरीसाठी १८ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

IOCL Recruitment
Government Job: पर्यावरण मंत्रालयात सरकारी नोकरीची संधी; २ लाख रुपये पगार; पात्रता काय? अर्ज कसा करावा? जाणून घ्या

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर होमपेजवर करिअर लिंकवर क्लिक करा. त्यानंतर रजिस्ट्रेशन करा. यानंतर अकाउंट लॉग इन करुन फॉर्म सबमिट करा. जर तुम्ही करिअरची उत्तम सुरुवात करायचा विचार करत असाल तर ही उत्तम संधी आहे. इंडियन ऑइल या कंपनीत तुम्हाला कामाचा अनुभव मिळणार आहे. हा अनुभव तुम्हाला पुढे आयुष्यात खूप उपयोगी पडणार आहे.

IOCL Recruitment
Income Tax Job: आयकर विभागात नोकरीची सुवर्णसंधी; पगार ८१००० रुपये; पात्रता काय? अशा पद्धतीने करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com