Navi Mumbai Jobs: खुशखबर! नवी मुंबई महानगरपालिकेत ६२० पदांसाठी बंपर भरती; १३२००० रुपये पगार ; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment: नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विविध विभागात ६२० पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
Navi Mumbai Municipal Corporation Recruitment
Navi Mumbai Municipal Corporation RecruitmentSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत (NMMC)नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट आणि गट डमधील विविध संवर्गातील पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने या भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये प्रशासकीय, अभियांज्ञिकी, तांत्रिक, वित्त, सार्वजनिक आरोग्य अशा अनेक विभागांमध्ये भरती करण्यात आली आहे. गट क आणि गट ड मधील ही भरती ६२० पदांसाठी आहे. (Navi Mumbai Municipal Corporation Recruitment)

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment
Metro Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मेट्रोत भरती सुरु, पगार २.८० लाख, पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर

या नोकरीसाठी तुम्ही २८ मार्चपासून अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीथ ११ मे २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

कोणत्या पदांसाठी भरती अन् पगार किती?

बायोमेडिकल इंजिनियर पदासाठी भरती आहे. या पदासाठी ४१८०० ते १३२३०० रुपये पगार मिळणार आहे. ज्युनिअर सिविल इंजिनियर, ज्युनियर बयोमेडिकल इंजिनियर, उद्यान अक्षिक्षक, माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवर या पदांसाठी ३८६००-१२८०० रुपये पगार मिळणार आहे.

डेंटल हायजिनिस्ट पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे. स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, इसीजी तज्ञ, सी.एस.एस.डी तंत्रज्ञ, आहार तंत्रज्ञ या पदासाठी ५४०० ते ११२४०० पगार मिळणार आहे.

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment
BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार २००००० रुपये पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

नेत्र चिकीत्सक सहाय्यक पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे. आरोग्य सहाय्यक महिला, औषध निर्माण अधिकारी या पदांसाठी २९२००-९२३०० रुपये गार मिळणार आहेय याचसोबत उद्यान सहाय्यक, लेखा लिपिक, शवविच्छेदन मदतनीस अशा अनेक पदांसाठी ही भरती होणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरायचे आहेत.

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment
Bank Jobs: सरकारी बँकेत मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com