UPI Latest Update: UPI युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! तुमचा मोबाईल नंबर बंद झालाय? तर 'हे' काम लगेच करा, अन्यथा...

NPCI UPI New Rules: नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल २०२५ पासून सुरु होणार आहे. यामध्ये UPI Payment करण्याऱ्यांच्या खिशाला आता कात्री लागण्याची शक्यता आहे. पुढे नवे नियम आणि नवे बदल जाणून घेऊया.
UPI
UPI PaymentSaam Tv
Published On

UPI New Rule: नवीन आर्थिक वर्ष उद्यापासून सुरु होणार आहे. 1 एप्रिल २०२५ मध्ये अनेक नियम बदलेले आहेत. त्यातील एक नियम UPI धारकांना लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम थेट लोकांच्या खिशावर होणार आहे. भारतात लोक मोठ्या संख्येने यूपीआय पेमेंटचा वापर करतात. त्यामध्ये उद्यापासून काही बदल करण्यात आले आहेत. ते पुढील माहितीतून समजून घ्या.

नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया ने UPI चे काही नियम बदलले आहेत. त्यामुळे तुम्हाला सुरक्षित व्यवहार करता येणार आहे. हा नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहे. यानियमात तुम्ही वापरत असलेले UPI तुमच्या चालू मोबाईलचे नसेल. तर तुमचे UPI बंद होऊ शकते. तसेच यामध्ये युपीआयला लिंक असलेला मोबाईल नंबर ९० दिवस वापरला नसेल. तर तुमचा नंबर दुसऱ्या व्यक्तिला दिला जाणार आहे. त्याने तुमच्या युपीआयमधील पैसे दुसऱ्याच्या युपीआय अकाउंटवर जाण्याची शक्यता आहे.

UPI
Bank Holidays: एप्रिल महिन्यात बँका तब्बल १५ दिवस बंद; वाचा सुट्ट्यांची लिस्ट

याचा अर्थ काय?

याचाच अर्थ तुम्ही जुना मोबाईल नंबर युपीआयला लिंक केला असेल आणि तो आता बंद झालाय. असे असेल तर तुमचे युपीआय काम करणे थांबेल. म्हणजेच तुम्ही युपीआय पेमेंटचा वापर करू शकत नाही.

नवीन अपडेट

१ एप्रिलपासून बदलेल्या नियमा प्रमाणे तुमचे युपीआय अ‍ॅप आठवड्यातून किमान १ वेळेस ग्राहकांच्या मोबाईल नंबर रेकॉर्ड तपासतील आणि अपडेट करतील.

युपीआय धारकांचे काम

१. बॅंकेत जावून तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा. तरच तुम्ही युपीआय वापरू शकाल.

२. तुम्ही जर नुकताच नवीन मोबाईल नंबर वापरत असाल. तर त्वरित नंबर रजिस्टर करून घ्या.

३. बॅंकेत रजिस्टर असलेला नंबर सतत वापरत राहा. त्यामुळे तुम्हीला सगळ्या सेवांचा लाभ घेता येतो.

कलेक्ट पेमेंट फिचर बंद होणार

फसवणूक कमी करण्यासाठी एनपीसीआयने अलिकडेच कलेक्ट पेमेंट फीचर काढून टाकण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आता हे फिचर मोठा व्यापार करणाऱ्यांसाठीच असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला २००० रुपयांपर्यंतचा व्यवहार करता येणार आहे.

UPI
Mumbai Tourism: ₹५०० चं खिशात अन् संडे ट्रीपचा प्लान करताय? मुंबईतील ५ ठिकाणांना द्या भेट, दिवस भन्नाट जाईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com