ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling: क्रेडिट कार्डने करु शकणार इन्कम टॅक्सचे पेमेंट; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Siddhi Hande

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. करदात्यांनी ३१ जुलैआधी आयटीआर फाइल करणे गरजेचे आहे. जर तुम्ही जुलै महिन्यानंतर आयटीआर फाइल केले तर तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तुम्ही काही कारणाने ३१ जुलैआधी आयटीआर फाइल केला नाही तर १ डिसेंबरपर्यंत भरु शकतात.परंतु यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. दंडासोबतच तुम्हाला तुमच्या करावर व्याजदेखील द्यावे लागेल. तुम्ही तुमचा आयटीआर कर क्रेडिट कार्डद्वारेदेखील भरु शकतात.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल तर पुन्हा करण्याची गरज नाही. या पोर्टलवर कर भरण्यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये क्रेडिट कार्डचादेखील पर्याय देण्यात आहेत.

ज्या लोकांना आयकर रिटर्न भरायचा आहे परंतु त्यांच्या अकाउंटला पुरेसे पैसे नाही. त्यांच्यासाठी क्रेडिट कार्डचा पर्याय उत्तम ठरेल. क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करणे खूप सोपे आहे. क्रेडिटा कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला लगेचच कन्फर्मेशनचा मेसेज येतो.

क्रेडिट कार्जद्वारे कर कसा भरावा

जर तुम्हाला क्रेडिट कार्डद्वारे कर भरायचा असेल तर सर्वप्रथम ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. यावर भरलेली माहिती तुम्हाला दोनदा तपासावी लागेल. यानंतर टीडीएसची माहिती चेक करावी लागेल.तुम्ही तुमची माहिती टीडीएस माहिती फॉर्म 16, फॉर्म 26AS आणि वर्षाच्या स्टेटमेंटमधून भरु शकतात.

यानंतर तुम्हाला आयटीआर फॉर्ममध्ये पेमेंटसाठी पर्याय दिसतील. या पर्यायांपैकी क्रेडिट कार्डचा ऑप्शन निवडायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव दिसेल. यात तुम्हाला क्रेडिट कार्डची माहिती नीट भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर माहिती पुन्हा एकदा तपासा.

तुमचे पेमेंट निश्चित झाले तर तुम्हाला त्याबाबत मेसेज येईल. ही पावती तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. जेणेकरुन पुढे तुम्हाला काही समस्या येणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

Suvarna Dhanorkar : लय भारी! सामाजिक भान, साम टीव्हीच्या अँकरचं केशदान...

Rahul Gandhi: आरक्षणाची 50 % मर्यादा वाढवा, शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीचीही मागणी; भाजपची होणार कोंडी?

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT