Indian Twitter Koo : ट्विटरला टक्कर देणारे Koo होणार भारतातून गायब; नेमकं काय आहे कारण? विराट कोहलीसह ९००० व्हीआयपींची होती अकाऊंट

Koo App Shut Down : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरला टक्कर देण्यासाठी भारतात सुरू करण्यात आलेल्या कू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद होणार आहे. विराट कोहलीसह ९००० व्हिआयपी आणि मंत्र्यांची यावर अकाऊंट होती.
Indian Twitter Koo
Indian Twitter KooSaam Digital
Published On

ट्विटरला (आताचा X) भारतात एकेकाळी तगडी फाईट दिलेल्या कू (Koo) हा स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता बंद होणार आहे. सह-संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावतका यांनी बुधवारी यांची माहिती दिली. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरला टक्कर देण्यासाठी या अॅपची सुरुवात करण्यात आली होती. विराट कोहलीसह ९००० व्हिआयपी आणि मंत्र्यांची यावर अकाऊंट होती.

Indian Twitter Koo
UPI वरुन पेमेंट करताना पैसे अडकलेत? मग कुठे करणार तक्रार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आम्ही अनेक मोठ्या इंटरनेट कंपन्या, समूह आणि मीडिया हाऊसेसोबत चर्चा केली मात्र हवे तसे परिणाम मिळाले नाहीत, असं कू कंपनीचे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी अलीकडेच LinkedIn वर केलेल्या पोस्टवर माहिती दिली होती. एकेकाळी अनेक नेते आणि कॅबिनेट मंत्र्यांनी कूवर आपली अधिकृत खाती उघडली होती. या प्लॅटफॉर्मची जाहिरात देसी ट्विटर म्हणून केली जात होती. मात्र, मोठं यश मिळून देखील आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंपनीला आपला व्यवसाय बंद करावा लागला आहे.

एक काळ असा होता जेव्हा कूच्या रोजच्या सक्रिय युजर्सची संख्या 21 लाखांवर पोहोचली होती. इतकेच नाही तर कंपनीच्या मासिक सक्रिय युजर्सची संख्या 1 कोटींवर पोहोचली होती. या प्लॅटफॉर्मवर 9 हजार VIP लोकांची खाती होती. या प्लॅटफॉर्मचा राजकीय व्यक्तींनीही मोठ्याप्रमाणात प्रचार केला होता.

Indian Twitter Koo
Stock Market : शेअर बाजार उघडताच नवा विक्रम; सेन्सेक्स पहिल्यांदा ८० हजार पार, निफ्टीनेही गाठला ऐतिहासिक उच्चांक

कू बंद होण्यामागचं प्रमुख कारण कारण तंत्रज्ञानावरील खर्च आणि अनपेक्षित बाजार भांडवल, असल्यांचं संस्थापकांकडून सांगण्यात येत आहे. यासोबतच संस्थापकांनी कंपनीची काही मालमत्ता विकण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. भारतीय सोशल मीडियामध्ये काहीतरी चांगले करण्याचा विचार करणाऱ्या कंपन्यांना ही मालमत्ता शेअर करताना आम्हाला आनंद होईल, असंही संस्थापकांनी म्हटलं आहे. या व्यासपीठाची ट्विटरशी थेट स्पर्धा होती. जेव्हा इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतलं त्यावेळी या प्लॅटफॉर्मवरील युजर्सची संख्या वाढली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com