Stock Market : शेअर बाजार उघडताच नवा विक्रम; सेन्सेक्स पहिल्यांदा ८० हजार पार, निफ्टीनेही गाठला ऐतिहासिक उच्चांक

Share market Update : शेअर बाजाराने नवा विक्रम रचला आहे. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स पहिल्यांदा ८० हजार पार गेला आहे. तर निफ्टीनेही ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.
शेअर बाजार उघडताच नवा विक्रम; सेन्सेक्स पहिल्यांदा ८० हजार पार, निफ्टीनेही गाठला ऐतिहासिक उच्चांक
Share Market Opening News TodaySaam Tv

नवी दिल्ली : शेअर बाजारात रोज नवनवीन विक्रम होत आहेत. शेअर बाजाराने बुधवारी नवा विक्रम रचला. शेअर बाजारात सेन्सेक्स पहिल्यांदा ८० हजार पार गेला आहे. तर निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.

शेअर बाजार सुरु होताच अवघ्या एका तासात सेन्सेक्सने ५९५ अंकानी उसळी घेतली. त्यामुळे सेन्सेक्सने ८०,०७० अंकावर पोहोचला आहे. तर निफ्टीमध्येही तेजी पाहायला मिळाली. अवघ्या एका तासात निफ्टीने १७९ अंकानी उसळी घेत २४,३०२ अंकावर पोहोचला.

शेअर बाजार उघडताच नवा विक्रम; सेन्सेक्स पहिल्यांदा ८० हजार पार, निफ्टीनेही गाठला ऐतिहासिक उच्चांक
Business Idea: पावसाळ्यात फक्त ५ हजारांत बिझनेस करा सुरू; ४ महिन्यांत कमवाल पाण्यासारखा पैसा!

सकाळी शेअर बाजार सुरु उघडताच बँकिंग क्षेत्रात तेजी पाहायला मिळत आहे. सर्वाधिक तेजी ही HDFC च्या शेअरमध्ये दिसली. या शेअरमध्ये ३ टक्क्यांहून अधिक उसळी पाहायला मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर एक्सिस बँकचा शेअर होता. एक्सिस बँकेच्या शेअरमध्ये १.८७ टक्क्यांनी उसळी पाहायला मिळाली. या व्यतिरिक्त ICICI आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्येही तेजी दिसली.

शेअर बाजार उघडताच नवा विक्रम; सेन्सेक्स पहिल्यांदा ८० हजार पार, निफ्टीनेही गाठला ऐतिहासिक उच्चांक
Business Ideas: नवीन व्यवसाय सुरु करायचाय?तर हे बेसिक नियम माहितीच पाहिजेत

एचडीएफसी बँकेच्या शेअरने घेतली उसळी

बुधवारी एचडीएफसी बँकेच्या शेअरनेही उसळी घेतली आहे. या शेअरने ३ टक्क्यांनी उसळी घेतली आहे. एचडीएफसीचा शेअरनेही ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. हा शेअर १७९४ रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र, ११.३० वाजता हा शेअर १७८४ रुपयांवर आला.

शेअर बाजार उघडताच नवा विक्रम; सेन्सेक्स पहिल्यांदा ८० हजार पार, निफ्टीनेही गाठला ऐतिहासिक उच्चांक
Business Idea: फक्त ५० हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई

दरम्यान, शेअर बाजारात आज बँकिंग, कंज्युमर ड्युरेबल्स आणि कॅपिटल गुड्स या शेअरने अनुक्रमे ८५१ अंक, २६१ अंक, ३८९ अंकांनी वाढ झाली. दुसरीकडे आयटी शेअरचं मोठं नुकसान झालं आहे. बीएसई आयटी इंडेक्स १०२ अंकानी घसरून ३७,९३९ अंकावर पोहोचला. तसेच टीसीएस, इन्फोसिस, सन फार्मा, टेक महिंद्रा आणि अल्ट्राट्रेक सिंमेटच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.

नोट - शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी मार्केट तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com