Business Idea: पावसाळ्यात फक्त ५ हजारांत बिझनेस करा सुरू; ४ महिन्यांत कमवाल पाण्यासारखा पैसा!

Business Idea In Monsoon: पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यातत छत्री आणि रेनकोट या दोन महत्त्वाच्या गोष्टी नेहमी बॅगेत असायलाच हव्यात. याच रेनकोट आणि छत्रीचा व्यवसाय करुन तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.
Business Idea
Business IdeaSaam Tv
Published On

पावसाळा सुरु झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडाताना काही गोष्टी सोबत ठेवणे गरजेचे आहे. त्यात रेनकोट, छत्री अशा गोष्टींचा समावेश होतो. तसेच लहान मुलांच्या शाळादेखील सुरु झाल्या आहेत. लहान मुलांना शाळेत जाताना नवीन प्लास्टिकचे शूड, वॉटरप्रूफ स्कून बॅग नवीन छत्री, रेनकोटची गरज असते. पावसाळ्यात तर रेनकोट, छत्रीला प्रचंड मागणी असते. त्यामुळे जर तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा असेल, कमी भांडवल असतानाही चांगली कमाई करायची असेल तर तुम्ही छत्री आणि रेनकोटचा व्यवसाय करु शकतात. वर्षातील चार महिने म्हणजेच पावसाळ्याच्या कालावधीत हा व्यवसाय खूप उत्तम पद्धतीने होऊ शकतो. या व्यवसायात फार मोठी आर्थिक जोखिमदेखील नसते. त्यामुळे हा व्यवसाय तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळवून देईल.

पावसाळ्यात तर छत्रीचा वापर करतात.तसेच उन्हाळ्यातदेखील उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेकजण छत्री वापरतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच हा व्यवसाय करु शकतात.

फक्त ५ हजार रुपयांची गुंतवणूक

तुम्ही फक्त ५ हजार रुपयांची गुंतवणूक करुन हा व्यवसाय सुरु करु शकतात. तुम्हाला जर लहान प्रमाणात व्यवसाय करायचा असेल तर ५ हजार रक्कम गुंतवणूकीसाठी पुरेशी आहे. पावसाळ्यात चत्री, रेनकोट, पावसाळी चप्पला, शूज, वॉटरप्रुफ बॅग या गोष्टींचा मागणी असते. तुम्ही हा माल घाऊक बाजारपेठेत विकत घेऊन स्थानिक बाजारपेठेत विकू शकतात. घाऊक बाजरपेठेते तुम्ही थेट उत्पादकाकडून माल खरेदी केल्यास तुम्हाला तो कमी किमतीत मिळेल. तसेच जास्त वस्तू घेतल्यास चांगला डिस्काउंटदेखील मिळतो. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या, रेनकोट आहेत. यात वेगवेगळे डिझाइन, कलरच्या छत्र्यांचा समावेश होतो. या वेगवेगळ्या रंगाच्या छत्र्या ग्राहकांना आकर्षित करतील. तसेच तुमच्याकडील क्वालिटी पाहून ग्राहक नक्की छत्री, रेनकोट खरेदी करतील.

Business Idea
Government Scheme: गरोदर महिलांना सरकार देणार ६ हजार रुपये; कसं? जाणून घ्या

पावसाळ्यात मच्छर खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे घरात मच्छरदाणीची गरज पडते. त्यामुळे लोक मच्छरदाणीदेखील खरेदी करतात.हा व्यवसायदेखील तुम्हाला २०-२५ टक्के नफा मिळवून देऊ शकतो. तुम्ही मच्छरदाणीचा कपडा बाजारातून विकत आणून घरात शिवू शकता. यामुळे कमी खर्चात तुम्ही जास्त नफा मिळवू शकतात.

Business Idea
उत्तम फीचर अन् 50MP कॅमेरा असलेल्या Moto Edge 50 Pro स्मार्टफोनवर मिळतेय ९ हजारांची सूट; जाणून घ्या ऑफर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com