Business Idea: फक्त ५० हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई

Start Artificial Jewellery Business: जर तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कमी भांडवलमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकतात आणि आणि दरमहा बक्कळ कमाई करू शकतात. विशेष म्हणजे हा व्यवसाय ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येतो.
Business Idea: फक्त ५० हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई
Start Artificial Jewellery Businessyou tube

Start Artificial Jewellery Business: कोणाची गुलामी नको. स्वत:चा मालक होत व्यवसाय सुरू करायचा आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला एका व्यवसायाची माहिती देत आहोत. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही दरमहा बक्कळ कमाई करू शकता. विशेष म्हणजे हा व्यवसाय ऑनलाइन आणि ऑफलाइन सुद्धा करू शकता. या व्यवसायातून तुम्ही दरमहिन्याला मोठी कमाई करू शकतात. चला तर कोणता व्यवसाय आहे, हे जाणून घेऊ. हा व्यवसाय आहे आर्टिफिशियल ज्वेलरी शॉपचा.

ऑफलाइन व्यवसाय

तुम्ही हा व्यवसाय ऑफलाइन देखील सुरू करू शकता. जर तुम्हाला ते ऑफलाइन सुरू करायचे असेल तर अशी जागा निवडा जिथे चांगली बाजारपेठ असेल आणि मोठ्या संख्येने लोक खरेदीसाठी येत असतील. दुकान उघडताना लक्षात ठेवा की, दुकानातील प्रकाश चांगला असावा जेणेकरून प्रकाश दागिन्यांवर पडल्यावर त्याची चमक अधिक दिसेल. दुकानात किमान १०-१५ प्रकारचे दागिने ठेवा जेणेकरून ग्राहकांना विविध पर्याय मिळतील.

ऑनलाइन व्यवसाय

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हा व्यवसाय ऑनलाइन देखील करू शकता. अनेक ऑनलाइन पर्याय आहेत. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन इत्यादी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्ही व्यवसाय सुरू करू शकतात. नाहीतर तुम्ही तुमची स्वतःची वेबसाइट किंवा ॲप तयार करून हा व्यवसाय सुरू करू शकतात. तसेच तुम्ही सोशल मीडियाद्वारे या दागिण्याची विक्री करू शकतात. ऑनलाइन विक्री करणारे बरेच लोक या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा फायदा घेतात.

दागिने कुठून खरेदी करायचे

जर तुम्हाला आर्टिफिशियल ज्वेलरीचे काम करायचे असेल तर तुम्ही ते दिल्लीच्या सदर मार्केटमधून खरेदी करू शकता. येथे कृत्रिम दागिने मोठ्या प्रमाणात स्वस्त दरात उपलब्ध आहेत. दिल्ली व्यतिरिक्त तुम्ही मुंबई (चोर बाजार), कोलकाता (न्यू मार्केट), हैदराबाद (चार मिनार मार्केट) इत्यादी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात कृत्रिम दागिने खरेदी करू शकता. मोठ्या प्रमाणात दागिने खरेदी करण्यासाठी आधी दर जाणून घ्या. सर्व बाजारपेठेत पूर्ण फेरफटका मारा. काही दुकानातून दर मिळवा. स्वस्त मिळेल तिथून खरेदी करा.

नफा किती मिळतो

तुम्ही कृत्रिम दागिने किरकोळ किंमतीच्या १० पटीने विकू शकता. दर ठरवणं ते तुम्ही कुठे विकत आहात यावर अवलंबून आहे. एखाद्या मॉलमधील आर्टिफिशियल ज्वेलरीची किंमत विचारली तर अशा अनेक वस्तू आहेत ज्यांची किंमत घाऊक बाजाराच्या १० पट अधिक असते. तरीही आपण लक्षात घेतलं तर दागिने घेतलेल्या किमतीच्या दरापेक्षा अधिकच्या दरात या विकल्या जातात. जर तुम्ही दररोज ५ हजार रुपयांची विक्री केली तर तुम्हाला किमान २ ते ३ हजार रुपयांचा नफा होऊ शकतो. अशाप्रकारे तुम्ही एका महिन्यात ६० ते ८० हजार रुपये सहज कमवू शकता.

अंगठ्या, कानातले, पेंडंट अशा छोट्या दागिन्यांना नेहमीच मागणी असते. जर तुमचे दुकान कॉलेजजवळ किंवा मार्केटमध्ये असेल जेथे मोठ्या संख्येने लोक खरेदीसाठी येतात, तर तेथे जास्त कमाई होऊ शकते. लग्नाच्या मोसमात जड दागिन्यांची मागणी जास्त असते. जड दागिन्यांमध्येही बचत जास्त असते. अशा परिस्थितीत या हंगामात दागिन्यांची विक्री करून चांगले उत्पन्न मिळवू शकता. महिलांच्या ज्वेलरीसह पुरुषांसाठी असलेल्या ज्वेलरीही तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवत जा.

Business Idea: फक्त ५० हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई
Gold Prices Decline : सोन्याचे दर गडगडले; दागिन्यांसाठी दुकानात नागरिकांची गर्दी, वाचा महाराष्ट्रातील आजचा भाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com