Gold Prices Decline : सोन्याचे दर गडगडले; दागिन्यांसाठी दुकानात नागरिकांची गर्दी, वाचा महाराष्ट्रातील आजचा भाव

Gold Rate Down (4 May 2024) : आज महाराष्ट्रातील २२ तसेच २४ कॅरेट सोन्याच्या किंमती काय आहेत. सोन्याचे भाव कितीने कमी झालेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.
Gold Prices Decline
Gold Prices DeclineSaam TV

सध्या लग्नसराई सुरू आहे. मे तसेच जून महिन्यात देखील लग्नाचे काही मुहूर्त आहेत. अशात गेल्या महिन्यात सोन्याचा भाव प्रचंड वाढला होता. त्यामुळे लग्नघरातील नागरिकांना मोठं टेन्शन आलं होतं. मात्र आता लग्नाच्या तयारीत असलेल्या नागरिकांना सोने खरेदीसाठी आजही दिलासा मिळणार आहे. शनिवारी देखील सोन्याचे दर घसरलेत.

Gold Prices Decline
Business Ideas: नोकरीच्या कटकटीतून व्हा मुक्त! कमी खर्चात व्यवसाय करुन हजारो रुपये कमवा

त्यामुळे आज महाराष्ट्रातील २२ तसेच २४ कॅरेट सोन्याच्या किंमती काय आहेत. सोन्याचे भाव कितीने कमी झालेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ. महाराष्ट्रातील काही मुख्य शहरांमधील आजचे सोन्याचे दर देखील येथे तुम्हाला समजतील.

आज सोन्याच्या दरात १० रुपयांचा फरक आहे. १० रुपयांनी प्रति तोळा सोन्याची किंमत घसरली आहे. त्यामुळे आज प्रति तोळा २२ कॅरेट सोन्याचा भाव ६५,८९० रुपये इतका आहे. काल हेच सोनं ६५,९०० रुपये प्रति तोळा विकलं गेलं. आज १०० ग्राम सोन्याची किंमत १०० रुपयांनी कमी झाली असून याची किंमत ६,५८,९०० रुपये इतकी आहे.

२४ कॅरेट सोन्याचा हिशोब समजून घेऊ

२४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत देखील प्रति तोळा १० रुपयांची घट दिसत आहे. आज प्रति तोळा २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,८७० रुपये इतकी आहे. तक १०० ग्राम सोन्यात १०० रुपयांची घट होऊन ७,१८,७०० रुपये वर भाव पोहचलेत. तसेच १८ कॅरेट सोनं प्रति तोळा ५३,९१० रुपयांनी विकलं जात आहे.

मुंबई आणि पुण्यातील सोन्याचा भाव

मुंबईमध्ये आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ६५,७४० रुपये इतकी आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,७२० रुपये इतकी आहे. तसेच मुंबईत १८ कॅरेट सोन्याचे दर ५३,७९० इतके आहेत.

पुण्यामध्ये २२ कॅरेट सोनं ६५,७४० रुपये प्रति तोळा, २४ कॅरेट सोनं ७२,७२० रुपये प्रति तोळा तर ५३,७९० रुपये प्रति तोळा असे दर आहेत. पुण्यातही सोन्याचे दर उतरले आहेत.

चेन्नईमध्ये २२ कॅरेट ६६,१४० रुपये, तर २४ कॅरेट ७२,१५० रुपये प्रति तोळा किंमत आहे.

नवी दिल्लीमध्ये २२ कॅरेट ६५,८९० रुपये, तर २४ कॅरेट ७१,८७० रुपये प्रति तोळा किंमत आहे.

कोलकत्तामध्ये २२ कॅरेट ६५,७५० रुपये, तर २४ कॅरेट ७१,७२० रुपये प्रति तोळा किंमत आहे.

चांदीचे दरही कोसळले

चांदीच्या किंमतीमध्ये देखील आज घसरण झाली आहे. १ किलो मागे १०० रुपयांचा फरक आहे. काल एक किलो चांदी ८३,५०० रुपयांना मिळत होती. आज एक किलो चांदीची किंमत ८३,४०० रुपये इतकी आहे.

Gold Prices Decline
Today's Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला; वाचा तुमच्या शहरातील नवे दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com