Rohini Gudaghe
नाश्ता सेंटर हा व्यवसाय नेहमी चालणारा व्यवसाय आहे. तो आपण कमी पैशात सुरू करू शकतो. वडापाव, समोसा, पोहे आणि उपमा असे पदार्थ तुम्ही विकू शकता.
उन्हाळा येत आहे. लिंबूपाणी, ताक आणि लस्सी यांची मागणी वाढत आहे. त्यामुळे तुम्ही ज्यूस पॉईंट सुरू केल्यास फायदा होतो. हा व्यवसाय कमी पैशांत सुरू करता येतो.
फोटोग्राफी हा अनेकांचा धंद असतो. याच छंदाला जर व्यवसाय बनवला तर चांगली कमाई होऊ शकते.
वेडिंग ब्युरो लहान शहरे आणि गावांमध्ये अधिक प्रचलित आहेत. त्यामुळे छोटंस ऑफिस, १-२ कर्मचारी सदस्य, नोंदणी प्रमाणपत्र आणि संपर्क तुम्हाला यशस्वी व्यावसायिक बनवू शकतात.
सध्या पर्यटनाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे तुम्ही ट्रॅव्हल एजन्सी सुरू केल्यास चांगला फायदा होतो.
सलून किंवा ब्युटी पार्लर हा सध्या ट्रेंडिंग व्यवसाय पर्याय आहे. या व्यवसायातून प्रचंड नफा कमावला जातो. गावाकडेही ब्युटी पार्लरला भरपूर मागणी आहे.
आईस्क्रीम हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तर तुम्ही हंगामानुसार या व्यवसायाला प्राधान्य देऊ शकता.
दिवसेंदिवस नव्या फॅशन आणि डिझायनची मागणी वाढत असते. कपड्यांचे दुकान हा कधीही न संपणारा व्यवसाय आहे. तो कमी खर्चातही करता येतो.