UPI वरुन पेमेंट करताना पैसे अडकलेत? मग कुठे करणार तक्रार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

UPI Payments Complaint: अनेक तक्रारींमध्ये UPI व्यवहारांमध्ये खाते बदलणे किंवा हटवणे, खाते माहिती लिंक करण्यात किंवा पुनर्प्राप्त करण्यात अडचण , या समस्या अधिक आहेत.
UPI वरुन पेमेंट करताना पैसे अडकलेत? मग कुठे करणार तक्रार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
UPI Payments Complaint

भारतात UPI द्वारे व्यवहार करण्याचे प्रमाणा वाढले आहे. हे देशांतर्गत प्लॅटफॉर्म म्हणजेच UPI अतिशय सुलभ आणि त्वरित पेमेंट लोकांच्या जीवनाचा एक भाग बनलं. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या नव्या डेटानुसार, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्लॅटफॉर्मवरील व्यवहारांची संख्या जूनमध्ये वार्षिक 49% वाढून 13.9 अब्ज झालीय.

या प्रक्रियेमधून पैशांची देवाण-घेवाण सोपी झाली, विशेष म्हणजे पैशांची देवाण-घेवाण आपण कधी करू शकतो. परंतु हे पेमेंट करताना अनेक अडचणी येत असतात. अनेकवेळा पेमेंट हस्तांतरण होताना अडचणी निर्माण होते. या समस्या कुठे सोडवायच्या? UPIच्या व्यवहाराच्या किंवा इतर तक्रारी दाखल कुठे करायच्या याची माहिती अनेकांना नाहीये.

UPI पेमेंटमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात?

UPI व्यवहारांमधील खाती बदलण्यात किंवा हटवण्याशी संबंधित समस्या, खात्याची माहिती लिंक करण्यात किंवा मिळवण्यात समस्या येतात. नोंदणी रद्द करण्याच्या वेळी अडचण निर्माण होते. UPI पिन हाताळताना, तुम्हाला पिन सेट करता न येणे, पिन ओलांडण्याच्या प्रयत्नांबद्दल एरर येणे. तुमचा पिन ब्लॉक करणे किंवा चुकीचा पिन टाकणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

या सारख्या समस्या तेव्हा होतात जेव्हा, तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात, परंतु व्यवहार म्हणजे पैसे पाठवल्यानंतर पैसे कट होतात. पण ते पैसे समोरील व्यक्तीला मिळत नाहीत, तेव्हा या समस्या उद्भवतात. तुम्ही चुकीच्या खात्यावर पैसे पाठवले, प्रलंबित किंवा पैसे पाठवणं रद्द केलं, मर्यादा ओलांडणे किंवा व्यवहार कालबाह्य होतात.

लॉग इन करता न येणे, ॲपवर नोंदणी करण्यात अयशस्वी होणे किंवा OTP एरर येण्यासारख्या समस्या अनेकांना आल्या असतील. या समस्या आल्यानंतर त्याचे निवारण आपल्याला कुठे करता येईल. आणि कशाप्रकारे त्या अडचणी सोडवता येतील याची माहिती आपण घेऊ.

ऑनलाइन तक्रार कशी कराल

सर्व प्रथम NPCI अधिकृत वेबसाईट https://www.npci.org.in/ नला भेट द्यावी.

‘What We Do’ यातील युपीए हा पर्याय निवडा. त्यानंतर ‘Dispute Redressal Mechanism’ हा पेजवर जा.

या पेजला स्क्रॉल डाउन करा आणि Complaint या पर्यायात Transaction पर्याय निवडा.

तुमच्या तक्रारीशी जुळणारे ‘ ‘Nature of the transaction’ हे निवडा.

वेबपेजवर दिलेल्या पर्यायांमधून तुमच्या समस्येचा प्रकार निवडा, उदा., खाते, पिन, नोंदणी, व्यवहार इत्यादी.

बँकेचे नाव, व्यवहार आयडी, UPI आयडी, रक्कम, व्यवहाराची तारीख आणि तुमचा ईमेल आयडी त्यात टाका.

तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. आणि तुमचा अपडेट केलेला बँक खात्याच्या तपशीलाचा फोटोही अपलोड करा.

तक्रार करण्याचा दुसरा पर्याय

तुम्ही UPI ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करू शकता.

कोणत्याही प्रश्नासाठी किंवा समस्येसाठी तुम्ही UPI हेल्पलाइन नंबर 18001201740 वर संपर्क साधू शकता.

तुम्हाला मदत करण्यासाठी हा टोल-फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहे.

UPI तक्रार करण्यासाठी महत्त्वाचे तपशील आवश्यक

तारीख, वेळ, ट्रांजेक्शन आयडी आणि गुंतलेली रक्कम यासह ट्रांजेक्शन तपशील द्या.

देणे-घेण्याच्या व्यवहारासाठी युनिक आयडेंटिफायर टाका. बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव आणि खाते क्रमांक द्या.

कोणत्याही त्रुटी मेसेज किंवा असामान्य स्क्रीनचे स्क्रीनशॉट जोडा.

तुम्हाला आलेल्या समस्येचे तपशीलवार वर्णन द्या. फोन नंबर आणि ईमेल पत्त्यासह तुमचे नाव आणि संपर्क करण्याची माहिती देखील शेअर करा.

UPI वरुन पेमेंट करताना पैसे अडकलेत? मग कुठे करणार तक्रार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
HDFC Bank Rule: मोठी बातमी! HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना बसणार मोठा फटका, ऑगस्टरपासून नियमात होणार मोठा बदल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com