ICICI Bank : NRI ग्राहकांसाठी ICICI बँकेचा महत्वपूर्ण निर्णय; परदेशातील मोबाईल नंबरवरून भारतात करता येणार UPI पेमेंट

ICICI Bank Allows UPI For NRI : बँकेनेही सेवा आपल्या मोबाईल बँकिंग अॅप iMobile Pay द्वारे उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी, भारतीय मोबाईल क्रमांकानेच NRI भारतीयांना यूपीआय पेमेंट करता येत होतं.
ICICI Bank
ICICI BankSaam TV

NRI ग्राहकांना त्यांचा आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबर वापरून भारतात त्वरित UPI पेमेंट करता येणार आहे. ICICI बँकेने आज हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केलाय. यामुळे NRI नागरिकांना दैनंदिन पेमेंट करण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.

ICICI Bank
ICICI Bank loan Fraud Case : मोठी बातमी! कोचर दाम्पत्याला दिलासा, ICICI बँक घोटाळाप्रकरणी जामीन मंजूर

या सुविधेमुळे बँकेत खाते असलेल्या व्यत्तीला भारतातील घरांचे लाइट बील, विविध बिझनेसमधील ई-कॉमर्स व्यवहारासाठी त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून शकतात. त्या नंबरशी बँक खाते लिंक केल्यावर हा फायदा होणार आहे.

बँकेनेही सेवा आपल्या मोबाईल बँकिंग अॅप iMobile Pay द्वारे उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी, भारतीय मोबाईल क्रमांकानेच NRI भारतीयांना यूपीआय पेमेंट करता येत होतं. आपल्या ग्राहकांना ही सुविधा देण्यासाठी ICICI बँकेने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे देशभरात UPI च्या सोयीस्कर वापरासाठी तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधांचा लाभ घेतला आहे.

यूएसए, यूके, यूएई, कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, ओमान, कतार आणि सौदी अरेबिया या 10 देशांमध्ये ICICI बँक ही सुविधा देते. बँकेचे अनिवासी भारतीय ग्राहक कोणताही भारतीय QR कोड स्कॅन करून, UPI ID किंवा कोणत्याही भारतीय मोबाइल नंबरवर किंवा भारतीय बँक खात्यावर पैसे पाठवून UPI पेमेंट करू शकतात.

याबाबत अधिक माहिती देताना ICICI बँकेचे डिजिटल चॅनेल आणि भागीदारी प्रमुख श्री. सिद्धार्थ मिश्रा म्हणाले, "iMobile Pay द्वारे आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरवर UPI सुविधा सुरू करण्यासाठी NPCI सोबत टायअप करताना आम्हाला आनंद होत आहे. या सुविधेमुळे बाहेरील देशातील आमच्या ग्राहकांची चांगली सोय होणार आहे."

iMobile Pay वरून आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरवर UPI कसे करायचे?

1: iMobile Pay अॅपमध्ये लॉग इन करा

2: 'UPI पेमेंट्स' वर क्लिक करा स्टेप

3: मोबाईल नंबर व्हेरिफाय करा

4: मॅनेजवर क्लिक करून माय प्रोफाईलमध्ये जा

५: नवीन UPI आयडी तयार करा

6: खाते क्रमांक निवडा आणि सबमिट करा.

ICICI Bank
ICICI Bank News: ICICI बँकेने केले १७ हजार क्रेडिट कार्ड ब्लॉक; कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com