Petrol Diesel Rate: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरातील भाव काय?

Petrol Diesel Rate 4th July 2024: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर होत असतात. पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून फार बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.
Petrol Diesel Rate
Petrol Diesel RateSaam Tv

देशात रोज सकाळी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले जातात. हे दर कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात फारसा बदल झालेला नाही. देशभरात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. फक्त महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात थोडासा बदल झालेला होता. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरावरील वॅट कर कमी केल्याने पेट्रोल ६५ पैशांनी स्वस्त झाले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल ८६.९२ डॉलरवर विकले जात आहे तर WTI क्रूड ऑइल ८३.५६ डॉलरवर विकले जात आहे. देशभरात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या दरात फारसा बदल झालेला नाही.

Petrol Diesel Rate
Post Office Recruitment 2024: 10 वी पास आहात? पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल नोकरी, 35000 पदे, पात्रता, वयोमर्यादा, वाचा डिटेल्स

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये प्रति लिटर आहे. कोलकत्ता येथे पेट्रोल १०४.९५ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९१.७६ रुपयांवर विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोल १००.७६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.३५ रुपयांवर विकले जात आहे.

Petrol Diesel Rate
Indian Twitter Koo : ट्विटरला टक्कर देणारे Koo होणार भारतातून गायब; नेमकं काय आहे कारण? विराट कोहलीसह ९००० व्हीआयपींची होती अकाऊंट

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुण्यात पेट्रोल १०३.६९ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९०.२३ रुपयांवर विकले जात आहे.ठाण्यात पेट्रोल १०३.८९ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९०.४० रुपये प्रति लिटर विकले जात आहे.नाशिकमध्ये पेट्रोल १०३.८१ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेल ९०.३५ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. नागपूरमध्ये पेट्रोल १०३.९६ रुपयांवर विकले जात आहे.तर डिझेल ९०.५२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. अहमदनगरमध्ये पेट्रोल १०४.४४ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेल ९०.९६ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल १०४.६६ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.१७ रुपये विकले जात आहे.

Petrol Diesel Rate
Gold Silver Rate : सोन्यासह चांदीच्या किंमतीत मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील नवे दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com