Nagpur News: नागपूर हिट अँड रन केस: भरधाव मर्सिडीजने चिरडून दोघांचा जीव घेणाऱ्या रितिका मालूची सुटका

Nagpur Hit And Run Case Latest Update: 24 फेब्रुवारी 2024 च्या रात्री नागपूर शहरामध्ये हिट अँड रनची घटना समोर आली होती. मध्यरात्री क्लबमधून घरी जात असताना भरधाव मर्सिडीज कारने दोन तरुणांना चिरडले होते.
Nagpur News: नागपूर हिट अँड रन केस: भरधाव मर्सिडीजने चिरडून दोघांचा जीव घेणाऱ्या रितिका मालूची सुटका
Nagpur Hit And Run Case Latest Update: Saamtv

पराग ढोबळे, नागपूर|ता. ३ जुलै २०२४

नागपुरमधील हिट अँड रन केस प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अनेक महिने फरार असलेल्या आरोपी रितिका मालूची काल न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुटका केली आहे. पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटकच बेकायदेशीर ठरवत ताशेरे ओढले आहेत.

Nagpur News: नागपूर हिट अँड रन केस: भरधाव मर्सिडीजने चिरडून दोघांचा जीव घेणाऱ्या रितिका मालूची सुटका
Pune Drunk And Drive News: पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन मुलाच्या वडील आणि आजोबांना जामीन!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 24 फेब्रुवारी 2024 च्या रात्री नागपूर शहरामध्ये हिट अँड रनची घटना समोर आली होती. मध्यरात्री क्लबमधून घरी जात असताना भरधाव मर्सिडिज कारने दोन तरुणांना चिरडले होते. या दुर्घटनेत हुसेन गुलाम मुस्तफा आणि मोहम्मद अतिक या दोन्ही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

याप्रकरणी कारचालक महिला रितिका मालूवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा अपघात झाल्यापासून रितिका मालू फरार होती. पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १ जुलै रोजी आरोपी रितिका मालूने आत्मसमर्पन केले होते. त्यानंतर काल तिची न्यायालयाने सुटकाही केली.

Nagpur News: नागपूर हिट अँड रन केस: भरधाव मर्सिडीजने चिरडून दोघांचा जीव घेणाऱ्या रितिका मालूची सुटका
Hathras Stampede: चेंगराचेंगरीत १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; स्थानिक गुप्तचर युनिटनं आधीच वर्तवली होती भीती,PM मोदींकडून शोक व्यक्त

पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटकच बेकायदेशीर ठरवत ताशेरे ओढले. तसेच या प्रकरणात कलमवाढ करण्या अगोदर पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाची परवानगी घेतली नव्हती. या कारणामुळे रितिका मालूची प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुटका केली.

Nagpur News: नागपूर हिट अँड रन केस: भरधाव मर्सिडीजने चिरडून दोघांचा जीव घेणाऱ्या रितिका मालूची सुटका
T20 World Cup: 'विश्वविजेती' टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली! खेळाडू हॉटेलमध्ये बंद, मायदेशी परतण्याचे मार्गही ठप्प; नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com