Hathras Stampede: चेंगराचेंगरीत १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; स्थानिक गुप्तचर युनिटनं आधीच वर्तवली होती भीती,PM मोदींकडून शोक व्यक्त

Uttar Pradesh Hathras Stampede : हाथरस येथे सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केलाय.
Hathras Stampede: चेंगराचेंगरीत १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; स्थानिक गुप्तचर युनिटनं आधीच वर्तवली होती भीती,PM मोदींकडून शोक व्यक्त
Uttar Pradesh Hathras StampedeSaam Tv

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सिकंदराराऊ परिसरात सत्संगाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. यात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झालेत. या चेंगराचेंगरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदी उत्तर देत होते. यावेळी त्यांना हाथरस चेंगराचेंगरीची बातमी मिळाली.

त्यावेळी पंतप्रधान मोदी लोकसभेतील भाषण करत होते. घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी यांनी आपले भाषण थांबवत चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला. तर जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो असं मोदी म्हणाले.

सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्यानंतर तेथे मृतदेहांचे ढीग पडले होते. एकावर एक अशा मृतदेह त्या ठिकाणी पडले होते. या सोहळ्यात २० ते ५० हजार लोक आले होते. दरम्यान या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होईल, अशी शक्यता स्थानिक गुन्हे शाखेने वर्तवली होती. सत्संगात झालेली प्रचंड गर्दी पाहून LIU ने अधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात काही मोठी घटना घडण्याची भीती व्यक्त केली होती.

मात्र त्यानंतरही अधिकारी गप्प बसले आणि आज चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १०७ भाविकांना प्राण गमवावे लागले. अपघातानंतर अधिकारी सतर्क झाले आणि ते घटनास्थळी रवाना झाले. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री योगी यांनी अधिकाऱ्यांकडून अहवालही मागवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलीय.

सिकंदराराऊ कोतवाली परिसरातील फुलराई गावात भोले बाबा साकार हरी यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आलं होतं. प्रशासनाला या सत्संगाच्या आयोजनाची माहिती असली तरी सत्संगाला येणाऱ्या भाविकांची संख्या कमी असणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र १.२५ लाखांहून अधिक भाविक सत्संगाला पोहोचले. सत्संगाला उपस्थित असलेल्या भाविकांची संख्या पाहून LIU ला काही मोठ्या घटनेचा संशय आला.

त्यांनी अहवाल तयार करून तो अधिकाऱ्यांना सादर केला. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. मंडपात उकाडा जाणवत असल्याने भाविकांचा श्वास गुदमरू लागला. त्यामुळे तीन तास चाललेल्या या सत्संगात अनेक भाविक बेशुद्ध पडले. सत्संग संपताच भाविक बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. त्यात चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत महिला आणि लहान मुलांसह अनेक लोक दबले गेले. या दुर्घटनेत १०७ भाविकांचा चिरडून मृत्यू झाला.

या घटनेनंतर नेत्यांनी शोक व्यक्त केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दु: ख व्यक्त केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर शोक व्यक्त केलाय. लोकांच्या मृत्यूबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलें. राष्ट्रपती मुर्मू यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेत महिला आणि मुलांसह अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी हृदयद्रावक आहे. ज्यांनी त्यांचे कुटुंबीय गमावले त्यांच्याबद्दल मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त करते, ” असं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केलाय. 'उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्यात. जखमी लोकांची तब्येत लवकरात लवकर बरे होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केलीय. सरकार आणि प्रशासनाला विनंती आहे की जखमींवर शक्य ते सर्व उपचार करावेत आणि पीडित कुटुंबांना मदत करावी. भारतातील सर्व कामगारांना विनंती आहे की त्यांनी मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com