Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात ३५ कृषी केंद्राचे परवाने रद्द; कृषी विभागाकडून २ जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पेरणीची तयारी शेतकर्‍यांनी सुरू केली आहे.
Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam tv
Published On

सुशील थोरात 
अहमदनगर
:  हंगामाच्या सुरवातीपासून कृषी विभागाची नजर कृषी केंद्रांवर आहे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथक नेमून नजर ठेवली जात होती. अहमदनगर जिल्ह्यात भरारी पथकांकडून तपासणी करत त्रुटी आढळून आलेल्या ३५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली आहे. 

Ahmednagar News
Beed News : सरकार विरोधात संगणक परिचारक आक्रमक; परळीत शासन निर्णयाची केली होळी

अहमदनगर जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पेरणीची तयारी शेतकर्‍यांनी सुरू केली आहे. बाजारपेठेत कपाशी, सोयाबीन यासह कडधान्य पिकांच्या बियाणांना मोठी मागणी आहे. यामुळे बियाणांचा काळाबाजार करत चढ्या दराने विक्री केली जात आहे. याबाबतच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. कृषी विभागाला (Agriculture Department) प्राप्त तक्रारीनुसार आणि अचानक भेटीद्वारे कृषी विभाग कृषी केंद्राची तपासणी करण्यास सुरवात केली. 

Ahmednagar News
Kalyan Accident : भरधाव कारची रिक्षाला धडक; कल्याणमधील घटना, रिक्षा चालक जखमी

कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून तपासणी करत गेल्या महिनाभरात ३५ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच १३ पेक्षा अधिक केंद्रांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. यासह जिल्ह्यात २ ठिकाणी थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात १५ भरारी पथकाची स्थापना देखील करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com