Beed News : सरकार विरोधात संगणक परिचारक आक्रमक; परळीत शासन निर्णयाची केली होळी

Beed News : परिचालकांची नियुक्ती महाआयटीकडून करून पुन्हा एकदा प्रकल्पात भष्टाचार करणाऱ्या कंपन्यांना काम देण्याचा घाट शासनाने घातला; असा आरोप करण्यात आला
Beed News
Beed NewsSaam t v

बीड : शासनाने संगणक परिचालकांसाठी नवीन निर्णय काढला आहे. याला विरोध करत बीडच्या परळीमध्ये सरकार विरोधात संगणक परिचारक आक्रमक झाले आहेत. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयाची संगणक परिचारकांनी होळी केली आहे.

Beed News
Parbhani News : महावितरणचे सव्वादोन लाख ग्राहक वापरताय फुकट वीज; बिलापोटी थकले २ हजार ३०० कोटी रुपये

संगणक परिचालकांबाबतच्या १९ जून २०१४ ला नवीन शासन निर्णयानुसार संगणक परिचालकांची नियुक्ती (Beed) महाआयटीकडून करून पुन्हा एकदा प्रकल्पात भष्टाचार करणाऱ्या कंपन्यांना काम देण्याचा घाट शासनाने घातला; असा आरोप करण्यात आला. या शासन निर्णयाला संगणक परिचकलांचा विरोध आहे. या विरोधात परळीत (Parali) आंदोलन करत शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

Beed News
Gondia Bribe Case : लाच मागणारा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; थकीत बिलावर स्वाक्षरीसाठी मागितली १० टक्के रक्कम

शासन निर्णयाची केली होळी 

तसेच ३ हजार रुपये मानधनवाढ हि पंधराव्या वित्त आयोगातून केल्याने संगणक परिचालकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने केले आहे. त्यामुळे हा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा, सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्यावे; ही मागणी घेऊन आज परळी पंचायत समिती कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करत संगणक परीचारकांनी आंदोलन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com