Parbhani News : महावितरणचे सव्वादोन लाख ग्राहक वापरताय फुकट वीज; बिलापोटी थकले २ हजार ३०० कोटी रुपये

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील वीज ग्राहकाकडे महावितरण कंपनीचे एकूण २ हजार ३०० कोटी रुपये थकल्याने।महावितरण कंपनी अडचणीत सापडली आहे
Mahavitaran
MahavitaranSaam tv

परभणी : महावितरण कडून अधिकृतपणे वीज कनेक्शन घेतल्यानंतर अनेकांकडून त्याचे बिल थकीत ठेवले  जात असते. यामुळे महावितरणच्या थकीत बिलाचा आकडा वाढ चालला आहे. या दरम्यान परभणी जिल्ह्यात तब्बल २३०० कोटी रुपयांची थकीत बिल झाले आहे.  

Mahavitaran
Poshan Aahar : शालेय पोषण आहाराला लागली किड; पुणे जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

परभणी (Parbhani) जिल्ह्यातील वीज ग्राहकाकडे महावितरण कंपनीचे एकूण २ हजार ३०० कोटी रुपये थकल्याने।महावितरण कंपनी अडचणीत सापडली आहे. परभणी जिल्ह्यात वीज वितरण (Mahavitaran) कंपनीकडून १ लाख ३० हजार घरगुती, तर ६ हजार वाणिज्य आणि २ हजार औद्योगिक यासह ९८ हजार कृषिपंप धारकांना वीज पुरवठा केला जातो. वीज बिल वापराचे महिन्याकाठी दिले जाणारे बिल अनेकांकडून वेळेवर भरले जात नाही. 

Mahavitaran
Sambhajinagar News : अंत्योदय रेशन कार्ड धारकांच्या घरावर लागणार पाट्या; राज्य सरकारच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना

सव्वादोन लाखापेक्षा जास्त ग्राहकांकडे बिल थकीत 

परभणी जिल्ह्यात जवळपास २ लाख ३८ हजार वीज ग्राहकांकडून वीज बिलाचा वेळेवर भरणा होत नसल्याने महावितरण कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. थकीत बिलाची रक्कम मोठी असल्याने महवितरणला हे बिल वसुली करण्याचे आता मोठे आव्हान असणार असून वसुलीसाठी पथके तयार करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com