Dombivli Crime News: मित्राला केलेला 'तो' मेसेज आणि पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; 8 तासात महिलेच्या हत्येचा उलगडा

Dombivli News: डोंबिवलीत एका महिलेच्या हत्येतील आरोपीला पोलिसांनी अवघ्या 8 तासात शोधून बेड्या ठोकल्या आहेत.
मित्राला केलेला 'तो' मेसेज आणि पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; 8 तासांत महिलेच्या हत्येचा उलगडा
Dombivli Crime NewsSaam Tv

अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण प्रतिनिधी

डोंबिवलीत एका महिलेच्या हत्येतील आरोपीला पोलिसांनी अवघ्या 8 तासात शोधून बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवली पश्चिम शास्त्रीनगर वसंत निवास इमारतीमध्ये 56 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली होती. आशा रायकर, असं हत्या झालेल्या महिलाच नाव आहे. हत्येच्या आठ तासात पोलिसांनी आरोपी यश विचारे या तरुणाला अटक केली आहे.

यश क्रिकेटच्या ऑनलाइन जुगारात पैसे हरला, त्यामुळे त्याच्यावर कर्ज झाले होते. कर्ज फेडण्यासाठी त्याने घरात एकट्याच राहणाऱ्या आशा रायकर याचे दागिने चोरण्याचा प्लॅन आखला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्याने आशा यांची गळा आवळून हत्या केली आणि त्यांचे दागिने चोरले. धक्कादायक म्हणजे यश हा त्यानंतर आरोपीच्या शोधात असलेल्या पोलिसांसोबतच सीसीटीव्ही देखील तपासत होता आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता.

मित्राला केलेला 'तो' मेसेज आणि पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; 8 तासांत महिलेच्या हत्येचा उलगडा
Nagpur Crime : चोरीच्या प्रकरणात वाठोडा पोलिसांनी दोघांना केली होती अटक; तपासात धक्कादायक माहिती आली समोर

यातच यशने आपल्या एका मित्राला मेसेज केला होता. यात लिहिलं होतं की, 'चल यार आज दारु पिते है, कल लगता है जमा होना पडेंगा.' यशच्या मित्रांची चौकशी करताना पोलिसांना हा मेसेज मिळाला. यानंतर विष्णूनगर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी यश विचारे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला यशने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पॉलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम शास्त्रीनगर परिसरात वसंत निवास ही इमारत आहे. या इमारतीत राहणाऱ्या आशा रायकर यांचे घराला बाहेरुन कडी होती. बराच दार न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी दार उघडून आत जाऊन पाहिले, तेव्हा आशा यांचा मृतदेह आढळून आला. आशा रायकर या कामगार रुग्णालयातून निवृत्त झालेल्या होत्या. त्यांची एक मुलगी विरारला राहते. आशा या एकट्याच राहत होत्या.

घडल्या प्रकाराची माहिती विष्णुनगर पोलिसांना देण्यात आली. विष्णुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आशा यांच्या गळ्यावर वण असल्याने त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. डीसीपी सचिन गुंजाळ, डोंबिवलीेचे एसीपी सुनिल कुराडे आणि विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या दोन पथकांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली.

यावेळी याच इमारतीत राहणार आहे यश विचारे हा तरुण देखील पोलिसांसोबत सीसीटीव्ही तपासत होता. इमारती बाहेरुन कोणी आले नव्हते हे सीसीटीव्हीत दिसून आले. जेव्हा यश नावाच्या या तरुणाकडे पोलिसांनी विचारपूस केली. तेव्हा यश विचाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आला. विष्णूनगर पोलिसांनी यशच्या काही मित्रांना विचारपूस करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणले. त्यापैकी एका मित्राने यश याने दुपारीच त्याच्या मोबाईलवर मेसेज केले होता. आज दारु पिते है. कल शायद जमा होना पडेंगा. या मेसेजमुळे यशनेच आशा रायकर यांचे हत्या केली, असावी असा पोलिसांचा संशय बळावला.

मित्राला केलेला 'तो' मेसेज आणि पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; 8 तासांत महिलेच्या हत्येचा उलगडा
Kolhapur Crime News : काेल्हापूरच्या ग्रामदैवत कपीलेश्वर मंदिरासह कसबा बावड्यात चाेरट्यांचा धुमाकूळ

पोलिसांनी तत्काळ यश विचारे याला ताब्यात घेतलं. तरीही यश उडवाउडवीची उत्तर देत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली. यशने दिलेला कबुलीजबाबामुळे पोलिसांना देखील धक्का बसला. यश क्रिकेटच्या ऑनलाइन जुगारात 60 हजार रुपये हरला होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याला पैशाची अत्यंत गरज होती. त्याने या इमारतीत एकट्याच राहणाऱ्या आशा रायकर यांचे दागिने चोरी करण्याचे ठरवले. तो आशा यांच्या मागे घरापर्यंत गेला. त्यांच्याकडे प्यायला पाणी मागितले.

आशा किचनमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या असता यश घरात बसला होता. यानंतर त्याने दरवाजा बंद करून त्यांची गळा आवळून हत्या केली. नंतर अशा यांच्या कानातील गळ्यातील दागिने घेऊन बाहेर पडला. त्याने दागिने सोनाराकडे नेते. त्यापैकी गळ्यातील चैन ही सोन्याची हाेती. तर कानातील रिंग नकली होती. सोन्याचे चैन विकून त्याला 17 हजार रुपये मिळाले. त्यातून त्याने पार्टी केली. दरम्यान, यश विचारे याला पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या आठ तासात एसीपी सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com