Pune News: महिलेला पोलीस ठाण्यात 'थर्ड डिग्री' टॉर्चर, पोलीस उपनिरीक्षकांसह 9 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News: पुण्यामध्ये पोलिसांकडून एका महिलेला थर्ड डिग्री टॉर्चर दिल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेला पोलीस ठाण्यात 'थर्ड डिग्री' टॉर्चर, पोलीस उपनिरीक्षकांसह 9 जणांवर गुन्हा दाखल
Pune Women Third DegreeSaam Tv

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पोलिसांकडून एका महिलेला थर्ड डिग्री टॉर्चर दिल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी एका महिलेला अमानुषपणे मारहाण केली, त्यामुळे ती गंभीर जखमी झाल्याचा आरोप आहे. हा प्रकार 23 मार्च 2023 रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास समर्थ पोलीस ठाण्यात घडला होता. समर्थ पोलीस ठाण्यात ही घटना घडली होती.

महिलेला पोलीस ठाण्यात 'थर्ड डिग्री' टॉर्चर, पोलीस उपनिरीक्षकांसह 9 जणांवर गुन्हा दाखल
Nagpur Accident: नागपूरमध्ये पुन्हा एकदा भयंकर अपघात, भरधाव कारने 4 जणांना उडवलं; CCTV व्हिडिओ आला समोर

याप्रकरणी पीडित महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सदाशिव दिवेकर, महिला पोलीस हवालदार निलम सचिन कर्पे तसेच 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य तीन जणांवर आयपीसी 354, 354(ब), 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याचबद्दल माहिती देताना पीडित महिलेने सांगितलं की, ''मला समर्थ पोलीस ठाण्यात मारहाण झाली होती. पिसांनी जबरदस्ती मला बोलवून माझ्या चारित्र्यावरून मला हिणवलं. जी केस सुरु आहे, ती मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. त्यानंतर मला धमकी ही दिली की, मी जर केस मागे घेतली नाही, तर ते मला मारून टाकतील.''

महिलेला पोलीस ठाण्यात 'थर्ड डिग्री' टॉर्चर, पोलीस उपनिरीक्षकांसह 9 जणांवर गुन्हा दाखल
Nagpur Accident: नागपूरमध्ये पुन्हा एकदा भयंकर अपघात, भरधाव कारने 4 जणांना उडवलं; CCTV व्हिडिओ आला समोर

काय आहे प्रकरण?

महिलेने तिचा पती अक्षय आवटे आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याचा राग मनात धरुन आरोपी पती व त्याच्या मित्रांनी महिलेला शिवीगाळ करुन धमकी दिली. त्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि नंतर थर्ड डिग्री टॉर्चर देत तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com