Mumbai News: : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलने संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना

Police Constable End Life Due To Wife: मुंबईमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून या पोलीस कॉन्स्टेबलने जीवन संपवल्याची घटना घडली आहे.
 पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या
Police Constable End Life Saam Tv

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

मुंबईमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना १४ जूनच्या रात्री ही समोर आली आहे. विजय साळुंखे असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्याने सायनमधील प्रतीक्षा नगर येथील राहत्या घरात गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, विजय साळुंखे सायनच्या प्रतीक्षा नगर येथे राहत (Mumbai News) होते. ते शाहू नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ३० मे पासून पोलीस कॉन्स्टेबल रजेवर होते. मृत विजय साळुंखे यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. मुंबईतील वडाळा टी टी पोलिसांनी विजय साळुंखे यांच्या अपमृत्यूची नोंद केली आहे. त्यांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

पुण्यातील घटना

पुण्यात बिल्डर तरुणाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे परिसरात ११ जून रोजी ही धक्कादायक घटना समोर आली (Police Constable End Life) होती. या तरूणाने कार्यालयामध्येच स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं आहे. हा तरूण फ्लॅट खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचं समोर आलं आहे

 पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या
Buldhana News: धक्कादायक! PM मोदींच्या सभास्थळी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; ट्रेनखाली संपवले आयुष्य

मयूर सुनील नरे, असं आत्महत्या केलेल्या या तरुणाचं नाव (Wife Torture) आहे. मयूर नरे हा विवाहित होता. तसंच तो जांभुळवाडी परिसरात राहात होता. रविवारी रात्री मयूर घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या भावाने कार्यालयात जावून पाहिले असता, मयूरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आले होते. त्याने एका कागदावर हिशोब लिहून ठेवल्याचं समोर आलं (crime news) होतं. या हिशोबाचा कागद पोलिसांना भेटला होता.

 पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या
Solapur News: पोलीस कॉन्स्टेबलची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; ऐन दिवाळीत कुटुंबावर शोककळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com