Buldhana News: धक्कादायक! PM मोदींच्या सभास्थळी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; ट्रेनखाली संपवले आयुष्य

Buldhana Breaking News: पोलीस कर्मचाऱ्याने शेगाव येथे मुंबई- नागपूर या लोहमार्गावरून धावणाऱ्या ओखा-पुरी एक्स्प्रेस समोर झोपून आत्महत्या केली.
Buldhana Crime News
Buldhana Crime NewsSaam tv

संजय जाधव, बुलढाणा|ता. २० एप्रिल २०२४

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथील कार्यक्रमात बंदोबस्तासाठी जाणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने शेगाव येथे मुंबई- नागपूर या लोहमार्गावरून धावणाऱ्या ओखा-पुरी एक्स्प्रेस समोर झोपून आत्महत्या केली. किसन गायकवाड असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एएसआय किसन गायकवाड हे अमडापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विदर्भातील वर्धा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी बुलढाणा जिल्ह्यातून पोलीस फौजफाटा रवाना करण्यात आलेला होता.

यामध्ये अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले एएसआय किसन गायकवाड हे सुद्धा रवाना झाले होते. दरम्यान शेगाव शहरातील अकोट रोडवर असलेल्या रेल्वे गेटजवळ सदर पोलीस कर्मचाऱ्याने मुंबई नागपूर या डाऊन रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या ओखा-पुरी एक्स्प्रेस समोर झोपून आपले जीवन संपवले.

Buldhana Crime News
Jay Pawar: अजित पवार मंचावर, जय पवार सभागृहाच्या दारावर; कार्यकर्त्यांसोबत उभं राहुन ऐकलं भाषण

या संदर्भात ओखापुरी एक्स्प्रेसचे लोको पायलट पी.एन. देशमुख यांनी व्हीएचएफद्वारे शेगाव रेल्वे स्टेशन मॅनेजरला अज्ञान व्यक्तीने शेगाव- ते नागझरी दरम्यान ट्रेन क्रमांक 20820 समोर आत्महत्या केली असल्याची माहिती दिली. दरम्यान या आत्मत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Buldhana Crime News
Baramati Constituency: उत्तम जानकरांचे अजित पवारांना खुलं आव्हान, राष्ट्रवादी काय उत्तर देणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com