uttam jankar challenges ajit pawar supports supriya sule in baramati constituency
uttam jankar challenges ajit pawar supports supriya sule in baramati constituency Saam Digital

Baramati Constituency: उत्तम जानकरांचे अजित पवारांना खुलं आव्हान, राष्ट्रवादी काय उत्तर देणार?

Baramati Lok Sabha Election: उत्तम जानकर यांनी अजित पवारांनाच खुलं आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.‌ यावर राष्ट्रवादी काय उत्तर देणार याकडेच लक्ष लागले आहे.

Uttam Jankar News :

माळशिरस येथील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी खुद्द राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख अजित पवारांनाच खुलं आव्हान दिले आहे.पक्ष प्रमुख अजित पवारांचा बारामतीमध्ये पराभव करूनच आपण पक्ष सोडणार असं मोठं विधान ही जानकर यांनी केलं आहे. त्यांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वेळापूरच्या सभेत बोलताना जानकरांनी हे विधान केले आहे.  (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहे. पक्षप्रमुख अजित पवार यांचा बारामतीमध्ये पराभव करूनच पक्ष सोडणार आहे असं मोठं विधान‌ माळशिरसचे उत्तम जानकर यांनी केले आहे. मी माझाच पक्षात राहणार आहे, मी काय पक्ष सोडणार नाही.

uttam jankar challenges ajit pawar supports supriya sule in baramati constituency
Kolhapur Constituency : प्रियांकां गांधींच्या टीममधील कोल्हापूरच्या युवा नेत्याची बंडखाेरी, ढसाढसा रडत भरला लोकसभेसाठी अर्ज

बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना निवडून आणल्याशिवाय मी या पक्षातून हटणार नाही. आमच्या पक्ष प्रमुखाचा पराभव आणि तिथं अडकलेलं घड्याळाचं चिन्ह घेऊन पुढील निर्णय घेऊ असं ही जानकर म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवारांनाच खुलं आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.‌ यावर राष्ट्रवादी काय उत्तर देणार याकडेच लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

uttam jankar challenges ajit pawar supports supriya sule in baramati constituency
Karad : कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर, मतदानावरचा बहिष्कार मागे घ्यावा; येणके ग्रामस्थांना गट विकास अधिकाऱ्यांचे आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com