Karad : कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर, मतदानावरचा बहिष्कार मागे घ्यावा; येणके ग्रामस्थांना गट विकास अधिकाऱ्यांचे आवाहन

Satara Latest Marathi News : येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन कराड पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना केले आहे.
karad bdo appeals yenke villagers to vote in election
karad bdo appeals yenke villagers to vote in electionSaam Digital
Published On

- मनोज जयस्वाल / संभाजी थाेरात

Maharashtra Lok Sabha Election 2024 :

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कोयाळी बुद्रुक तसेच सातारा जिल्ह्यातील येणके गावातील ग्रामस्थांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मूलभूत सुविधांसाठी हा बहिष्कार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान येणके ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

कोयाळी बुद्रुक येथील चार वर्षापूर्वी झालेले आरोग्य उपकेंद्र वाशिम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार मागणी करूनही बंद आहे. यामुळे ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य सेवेपासून वंचीत राहावे लागत आहे. जोपर्यंत उपकेंद्र चालू होणार नाही ताेपर्यंत आम्ही मतदान करणार नाही असा एकमताने निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

karad bdo appeals yenke villagers to vote in election
Voter Awareness Programme: नवी मुंबईत 280 शाळांमधील विद्यार्थ्यांंकडून मतदार जागृती, चित्रे आणि रांगोळीने नागरिकांचे वेधले लक्ष

सातारा जिल्ह्यातील मौजे येणके (ता. कराड) येथील कुंभार वस्ती मधील नागरिकांनी पाण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान प्रशासनाने कुंभार वस्तीसाठी जलजीवन मिशन अंतर्गत वितरण व्यवस्था व नळ जोडणी करण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे असे म्हटले आहे. या कामातील दाबनलिकेचे काम पूर्ण झाले आहे. वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीत आहे. कुंभार वस्ती येथील नागरिकांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घ्यावा. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन कराड पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना केले आहे.

karad bdo appeals yenke villagers to vote in election
Kannad Ghat : कन्नड घाटात आजपासून सर्व प्रकाराच्या वाहनांना बंदी, जाणून घ्या पर्यायी मार्ग

येणके येथील कुंभार वस्ती येथील योजने सद्यस्थितीची प्रगती 40 टक्के इतकी असून उर्वरित काम येत्या 4 ते 5 महिन्यात पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात येणार आहे. या योजनेद्वारे गावच्या पाणीपुरवठा विषयक समस्या कायम स्वरुपी मिटणार असल्याने कुंभार वस्तीतील नागरिकांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहनही कराडच्या गट विकास अधिकारी यांनी केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

karad bdo appeals yenke villagers to vote in election
RTE Admission : पालकांनाे! ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ; ऑनलाइन अर्ज करण्यासाठी जाणून घ्या संकेतस्थळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com