Voter Awareness Programme: नवी मुंबईत 280 शाळांमधील विद्यार्थ्यांंकडून मतदार जागृती, चित्रे आणि रांगोळीने नागरिकांचे वेधले लक्ष

शाळास्तरावर झालेल्या या उपक्रमातून पालकांमध्ये, मतदारांमध्ये चांगला संदेश जाईल, यातून निश्चितच मतदान टक्केवारी वाढण्यास भर पडेल असा विश्वास शिक्षकांनी देखील व्यक्त केला.
voter awareness program held in navi mumbai on eve of lok sabha election 2024
voter awareness program held in navi mumbai on eve of lok sabha election 2024Saam Digital

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai :

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध उपक्रम राबविले जाताहेत. नवी मुंबई मनपाच्या शालेय विद्यार्थ्यांमार्फत रांगोळी आणि चित्रे काढून मतदान जनजागृती करण्यात आली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

“चला, मतदान करण्यास पुढे येऊया – आपल्या देशाचा विकास करुया”, अशी मतदान विषयक जनजागृती करणारी घोषवाक्ये लिहून त्याला अनुरुप चित्रे व रांगोळी रेखाटत नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आपापल्या संकल्पना वापरत लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे महत्त्व अधोरेखित केलेय.

voter awareness program held in navi mumbai on eve of lok sabha election 2024
Abhijit Pakhare UPSC Success Story : जिद्दीच्या जोरावर अभिजित पाखरेंची यशाला गवसणी,चारवेळा अपयश तरीही जिद्द कायम ठेवत यूपीएससी परीक्षेत मिळवलं यश

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृतीचा स्वीप कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असून स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती करणारे विविध उपक्रम सर्व स्तरांवर राबविण्यात येत असून देशाचे उद्याचे नागरिक असणा-या विद्यार्थ्यामार्फत त्यांच्या पालक व नातेवाईकांपर्यंत मतदान करुन लोकशाहीतील हक्क बजावण्याचा संदेश प्रसारित केला जात आहे. याकरिता शाळा व महाविद्यालयांमध्ये नानाविध उपक्रम नाविन्यपूर्ण रितीने राबविण्यात येत आहेत.

नवी मुंबई मनपाच्या 57 प्राथमिक आणि 23 माध्यमिक अशा एकूण 80 शाळांसह 200 हून अधिक खाजगी शाळांमध्येही चित्रे व रांगोळीच्या माध्यमातून मतदान विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात काही पालकांनी देखील आवर्जुन सहभाग नाेंदविला. शाळास्तरावर झालेल्या या उपक्रमातून पालकांमध्ये, मतदारांमध्ये चांगला संदेश जाईल, यातून निश्चितच मतदान टक्केवारी वाढण्यास भर पडेल असा विश्वास शिक्षकांनी देखील व्यक्त केला. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

voter awareness program held in navi mumbai on eve of lok sabha election 2024
Tuljapur Yatra 2024: चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवानिमित्त तुळजापूरात भाविकांची गर्दी; जाणून घ्या तुळजाभवानीच्या दर्शन मार्गातील बदल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com