Jay Pawar: अजित पवार मंचावर, जय पवार सभागृहाच्या दारावर; कार्यकर्त्यांसोबत उभं राहुन ऐकलं भाषण

Indapur News: इंदापूरमध्ये एकीकडे अजित पवार यांचं मंचावर भाषण सुरू होतं, तर जय पवार सभागृहाच्या दारावर उभे राहून कार्यकर्त्यांसोबत भाषण ऐकत होते.
अजित पवार मंचावर, जय पवार सभागृहाच्या दारावर; कार्यकर्त्यांसोबत उभं राहुल ऐकलं भाषण
Jay PawarSaam Tv

Jay Pawar News:

>> अक्षय बडवे

इंदापूरमध्ये आज हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी उपस्थितीत असलेल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये उभं राहून सभेला उपस्थिती लावली.

एकीकडे अजित पवार यांचं मंचावर भाषण सुरू होतं, तर जय पवार सभागृहाच्या दारावर उभे राहून कार्यकर्त्यांसोबत भाषण ऐकत होते. यावेळी अनेकांनी त्यांना मंचावर यायला आमंत्रित केले. तसेच बसण्यास सांगितले. मात्र त्यांनी आमंत्रण नाकारत, उभं राहून कार्यकर्त्यांशी चर्चा करत या मेळाव्याला उपस्थित राहिले.

अजित पवार मंचावर, जय पवार सभागृहाच्या दारावर; कार्यकर्त्यांसोबत उभं राहुल ऐकलं भाषण
Hatkanangle Lok Sabha: हातकणंगलेत कोणाला हात, कोणाचा घात? मविआला शेट्टींचा अन् महायुतीला पाटलांचा धसका

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले आहेत की, ''मोदीजी यांना आपला देश संपूर्ण जगात अर्थव्यवस्थामध्ये तिसऱ्या क्रमांकावर न्यायचा आहे. राहुल गांधी यांची काय कारकीर्द आहे? केंद्रात आपल्या विचाराचा खासदार आणायचं आहे. बारामतीमध्ये किती निधी आला याची, शहानिशा तुम्ही करा. महायुतीच्या उमेदवार जर खासदार झाल्या, तर निधी कमी पडू देणार नाही.''

ते म्हणाले, ''उद्या बारामतीमध्ये मी प्रचाराचा नारळ फोडणार आहे. हर्षवर्धन पाटील त्यांच्या पद्धतीने सभा घेतील आणि दत्ता मामा वेगळ्या सभा होईल आणि त्यानंतर संयुक्तिक सभा होतील.''

अजित पवार मंचावर, जय पवार सभागृहाच्या दारावर; कार्यकर्त्यांसोबत उभं राहुल ऐकलं भाषण
Bhavana Gawali: मला उमेदवारी मिळू नये, म्हणून काही लोक फडणवीस - ठाकरेंकडे गेले होते; भावना गवळी यांचा गौप्यस्फोट

अजित पवार पुढे म्हणाले, ''देश मजबूत असेल, तर राज्य मजबूत राहतील. काही जणं जर चुकत असतील तर त्यांना सांगावं लागेल. समज गैरसमज होऊ देऊ नका. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. एक काम झालं की दुसरं काम ते झालं की तिसरं. आपल्या पक्षात मात्र अलबेल नव्हतं. इथे तसं चालत नाही, शिस्त म्हणजे शिस्त. आरआरएसची त्यांना शिकवण आहे. मोदी साहेबांच्या डोक्यात नेहमी देशाचा विकास असतो. मोदी निवडून आले की, संविधान बदलतील अशा थापा मारल्या जातात.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com