Kolhapur Crime News : काेल्हापूरच्या ग्रामदैवत कपीलेश्वर मंदिरासह कसबा बावड्यात चाेरट्यांचा धुमाकूळ

valuables robbed from kolhapur gramdaivat kapileshwar temple: शहरातील वाढत्या चाे-यांच्या घटनांमुळे काेल्हापुरातील नागरिक हैराण झाले आहेत. पाेलिसांनी उपाययाेजना कराव्यात अशी मागणी जाेर धरु लागली आहे.
valuables robbed from kolhapur gramdaivat kapileshwar temple
valuables robbed from kolhapur gramdaivat kapileshwar temple Saam Tv
Published On

- रणजीत माजगावकर

कोल्हापूर शहर व परिसरात चाे-यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात छाेट्या माेठ्या चाे-या झाल्याच्या घटना पाेलिस डायरीमधील नाेंदींवरुन स्पष्ट हाेत आहे. विशेष म्हणजे चाेरट्यांना कोल्हापूराचे ग्रामदैवत कपीलेश्वर मंदिरात देखील हातसफाई केल्याने भाविकांत चीड निर्माण झाली आहे.

कोल्हापूरात शुक्रवारी शहाराचे ग्रामदैवत असलेल्या कपीलेश्वर मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार समाेर आला आहे. कपीलेश्वर मंदिरातील शिवलिंगावरचे तांब्याचे अभिषेकपात्र तसेच पूजेच सर्व साहित्य चोरट्यांनी लंपास केले. या मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुखवटा देखील चाेरट्यांना लांबविला. या घटनेमुळे भाविकांत चाेरट्यांविषयी चीड निर्माण झाल्याचे चित्र मंदिर परिसरात आज हाेते.

valuables robbed from kolhapur gramdaivat kapileshwar temple
Shivsena: कारभारात सुधारणा करा अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, शिवसैनिकांचा कल्याण महावितरणला इशारा

दरम्यान कोल्हापुरात सध्या मॉडीफाय (मूळ स्वरुपात बदल) केलेल्या यामाहा मोटरसायकलींवर चाेरट्यांची नजर पडत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील कसबा बावडा परिसरात यामाहा मोटरसायकलची चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याचे विविध घटनांमुळे समाेर आले आहे. या परिसरात 3 चोरांनी मध्यरात्रीच्या सुमासा दोन यामाहा मोटरसायकली चोरल्याचे सीसीटीव्ही कैद झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

valuables robbed from kolhapur gramdaivat kapileshwar temple
ठेकेदारांची शक्ती वाढवण्यासाठी महामार्गाचा घाट, शेतकरी आक्रमक; शक्तीपीठ महामार्ग विरोधात 18 जूनला कोल्हापुरात महामोर्चा (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com