ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling 2025: पहिल्यांदा आयटीआर भरताय? नो टेन्शन, स्टेप बाय स्टेट प्रोसेस जाणून घ्या, आयकर विभागाने जारी केला व्हिडिओ

ITR Filling 2025 Step By Step Process: पहिल्यांदा आयटीआर फाइल करताना अनेकांच्या मनात प्रश्न असतात. दरम्यान, आयटीआर फाइल कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या.

Siddhi Hande

आयटीआर भरण्यासाठी आता शेवटचा १ महिना उरला आहे. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहेत. ज्यांनी अजूनपर्यंत आयटीआर फाइल केला नाही त्यांनी लवकरात लवकर करावेत. दरम्यान, जर तुम्ही पहिल्यांदा आयटीआर फाइल करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुमचा आयटीआर फाइल सोप्या आणि कोणत्याही अडचणींशिवाय भरायचा असेल तर या गोष्टींची नेहमी काळजी घ्या.

आयकर विभागाने एक्स या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करत आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस सांगितली आहे.

सर्वात आधी तुम्ही जर पहिल्यांदा आयटीआर फाइल करत असाल तर रजिस्टर करावे लागेल. पॅन कार्ड आणि आधार कार्डद्वारे रजिस्टर करा. त्यानंतर लॉग इन करुन आयटीआर भरा.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला टॅक्स पोर्टलवर जाऊन रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या पॅन कार्डची माहिती आणि आवश्यक माहिती भरा. तुम्हाला ओटीपी येईल. यानंतर तुम्ही पासवर्ड टाका. यानंतर तुम्ही अकाउंटमध्ये लॉग इन करु शकतात.

आयटीआर फाइल करण्याच्या स्टेप्स (ITR Filling Step By Step Process)

तुम्हाला सर्वात आधी सर्व कागदपत्रे जमा करायची आहेत. त्यात बँक स्टेटमेंट, उत्पन्नाची माहिती असायला हवी.

यानंतर आयकर विभागाच्या वेबसाइटवरुन फॉर्म 26AS आणि AIS डाउनलोड करायचा आहे. ही माहिती उत्पन्न आणि टीडीएसशी क्रॉस चेक करा.

यानंतर तुमच्या उत्पन्नानुसार फॉर्म निवडायचा आहे.

यानंतर तुम्हाला तुमचे उत्पन्न, डिडक्शन, सेव्हिंग, गुंतवणूक आणि होम लोनची माहिती द्यायची आहे.

यानंतर तुम्हाला रिटर्न सबमिट करायचा आहे.

यानंतर ई व्हेरिफिकेशन होऊन तुमची प्रोसेस पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljapur News: तुळजापुरात भाजप अन् जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आमनेसामने

Crime : २१ वर्षीय तरुणीचा रात्री संशयास्पद मृत्यू, पहाटेच अंत्यसंस्कार, नेमकं कारण काय?

Jaya Bachchan: 'हे काय करताय तुम्ही...'; जया बच्चन यांना राग अनावर, सेल्फी काढायला आलेल्या व्यक्तीला दिला जोरात धक्का

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

SCROLL FOR NEXT