Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Bank rules update : आता बँक खात्यात ठेवावे 50 हजार रुपये लागणार आहे. असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजचं सत्य काय? जाणून घ्या.
bank new rules
bank rules Saam tv
Published On

तुम्ही बँक खात्यात पैसे ठेवत असाल तर आता किमान रक्कम 50 हजार इतकी ठेवावी लागणार आहे...असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...आणि 50 हजार रुपये ठेवले नाही तर तुम्हाला बँक दंड लावणार आहे...त्यामुळे असा नियम कोणत्या बँकेनं केलाय...खरंच बँकेत 50 हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवणं बंधनकारक आहे का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

bank new rules
Mandal Yatra : शरद पवारांच्या मंडल यात्रेत पाकीटमारांचा सुळसुळाट; शहर अध्यक्षांच्या खिशातून २० हजार लंपास, तावडीत सापडताच चांगलाच चोपला

'जर तुमचेही बँकेत खाते असेल तर बचत खात्यांसाठी किमान सरासरी रक्कम 50 हजार रुपये ठेवावी लागेल...किमान रक्कम न ठेवल्यास ग्राहकांवर बँक दंड लावणार, असे या व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे.

हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय...प्रत्येकाचं बँकेत खातं आहे...त्यामुळे याची सत्यता आमच्या प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे...खरंच बँकांनी आता बचत खात्यावरही काही नियम लावलेयत का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने तज्ज्ञांकडून माहिती मिळवली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

bank new rules
Vastu For Home: नवीन घर बांधताना 'या' ८ वास्तु नियमांचं पालन करायलाच हवं!

ICICI बँकेने नवीन नियम लागू केलाय

बचत खात्यात किमान 50 हजार ठेवावे लागणार

हा नियम 1 ऑगस्टपासून पासून लागू झाला

यापूर्वी ICICI बँकेत 10 हजार ठेवावे लागायचे

ग्रामीण भागात 10 हजार रुपये ठेवणं आवश्यक

खात्यात किमान रक्कम न ठेवल्यास दंड भरावा लागेल

bank new rules
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट

खात्यात मिनिमम पैसे ठेवले नाहीत तर किती दंड लागणार हे सांगण्यात आलेलं नाही...मात्र, हा नियम आयसीआयसीआय बँकेसाठी लागू करण्यात आलाय...आमच्या पडताळणीत ICICI बँकेत आता किमान पैसे 50 हजार ठेवावे लागणार असल्याचा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com