
केंद्र सरकारची मुलींसाठी खास सुकन्या समृद्धी योजना
या योजनेत १० वर्षांखालील मुलींच्या नावे केली जाते गुंतवणूक
मुलगी २१ वर्षांची झाल्यावर मिळणार ७१ लाख रुपये
केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहे. यामध्ये अनेक योजना महिलांसाठी आणि मुलींसाठी सुरु केल्या आहेत. केंद्र सरकारने मुलींसाठी खास सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलींना आर्थिक संरक्षण दिले जाते. या योजनेत मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत सर्व खर्च केला जातो.
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana)
केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ७१ लाख रुपये मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला थोडी रक्कम गुंतवायची आहे. त्यानंतर तुमची मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तुम्हाला ७१ लाख रुपये मिळणार आहे. या योजनेत आतापर्यंत ४.१ कोटी अकाउंट उघडले आहेत. या योजनेत लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट प्लान आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुमची मुलगी काही वर्षातच लखपती होते.
या योजनेत तुम्हाला सर्वात जास्त व्याजदर मिळते. या योजनेत बँक आणि एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त व्याज मिळते. सुकन्या समृद्धी योजनेत ८.२ टक्के व्याजदर मिळते. हे सर्वाधिक व्याजदर आहे. या योजनेतील गुंतवणूकीवर सरकार स्वतः गॅरंटी देते. या योजनेत टॅक्स सूटदेखील मिळते.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे (Sukanya Samruddhi Yojana Benefits)
या योजनेत फक्त २५० रुपये गुंतवून अकाउंट उघडले जाते
या योजनेत ८.२ टक्के व्याजदर मिळते
१० वर्षांच्या आतील मुलींच्या नावावर खाती उघडले जातात
या योजनेत १५ वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी आहे
या योजनेत १.५ लाखांपर्यंत टॅक्स सूट मिळते
७१ लाख रुपये मिळतात
सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही किती रक्कम गुंतवणूक केल्यावर किती पैसे मिळतात हे समजले. या योजनेत मुलींच्या नावावर २१ वर्षांनंतर ७१ लाख रुपये मिळतात. या योजनेत जर तुम्ही दर वर्षी १.५ लाख रुपये गुंतवले जातात. तुम्ही जर सतत १५ वर्षे १.५ लाखांची गुंतवणूक केली तर तुम्हाला ७१,८२,११९ रुपये मिळतात. यामधील २२,५०,००० रुपये तुम्ही जमा कराल त्यावर ४९,३२,११९ रुपये व्याज मिळते. या योजनेत मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम टॅक्स फ्री असते.
सुकन्या समृद्धी योजना काय आहे?
सुकन्या समृद्धी योजना खास मुलींसाठी राबवण्यात आली आहे. यामध्ये १० वर्षांखालील मुलींच्या नावे गुंतवणूक केली जाते.
सुकन्या समृद्धी योजनेत किती वर्षानंतर पैसे मिळतात?
सुकन्या समृद्धी योजनेचा मॅच्युरीटी कालावधी हा १५ वर्षांचा आहे. मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतात.
या योजनेत अकाउंट कसं ओपन करायचं?
सुकन्या समृद्धी योजनेत अकाउंट तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उघडू शकतात. तुम्हाला दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा करायची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.