
आयटीआर फाइल करताना तुम्ही कर वाचवू शकतात
या ५ मार्गांनी तुम्ही टॅक्स वाचवू शकतात
नवीन कर प्रणालीतील बदल
आयटीआर फाइल करण्याचा सीझन सुरु झाला आहे. दरम्यान, अनेकांनी नवीन कर प्रणालीत अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये जुन्या कर प्रणालीतील कपात रद्द करण्यात आली आहे. परंतु तरीही तुम्ही कर वाचवू शकतात. यासाठी काही पर्याय आहेत. तुम्ही या ५ मार्गने कर वाचवू शकतात.
CTC मध्ये बदल
नवीन टॅक्सप्रणाली काही खर्चांवर सूट मिळतात. यामध्ये पुस्तके, मासिके, शिक्षण आणि कौशल्य अभ्यासक्रम, कंपनी भार भाडेपट्टा, जेवणाचे व्हाउचर या गोष्टींचा समावेश आहे. या रिफंडसाठी तुम्हाला बिले देणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही टॅक्स वाचवू शकतात.
एनपीएस (NPS)
नवीन कर प्रणालीत 80CCD (2) अंतर्गत नियोक्ताने नॅशनल पेन्शन सिस्टीममधील योगदान करमुक्त केले आहे. नियोक्ता या खात्यात पगाराच्या १४ टक्के रक्कम जमा करु शकते.यातील ६० टक्के रक्कम वयाच्या ६०व्या वर्षी काढता येते.
ईपीएफ आणि व्हीपीएफमध्ये अतिरिक्त योगदान
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील योगदान करमुक्त आहेत. कर्मचारी आपल्या इच्छेनुसार स्वेच्छा भविष्य निर्वाह निधीद्वारे योगदान वाढवू शकतात. दरम्यान, एनपीएस आणि ईपीएफमधील योगदान ७.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. ईपीएफ योगदानाची मर्यादा २.५ लाख रुपये आहे.
आर्बिट्रेज फंड आणि कॅपिटल गेन हार्वेस्टिंग
फिक्स्ड डिपॉझिटऐवजी तुम्ही आर्बिट्रेज फंडमध्ये गुंतवणूक करु शकतात. यामध्ये तुम्हाला एफडीसारखे रिटर्न मिळते. एफडीवरील व्याजदरावर कर लागतो. परंतु आर्बिट्राज फंडमध्ये एक वर्षानंतर मिळणाऱ्या लाँग टर्म गेनवर १२.५ टक्के टॅक्स दर असते.
भाड्याने दिलेल्या संपत्तीवर कर सूट
नवीन कर प्रणालीत हाउंस रेंट अलाउंस आणि होम लोनवर मिळणारी सूट काढून टाकण्यात आली आहे. परंतु जर तुमचे कोणतेही घर भाड्याने दिले असेल तर त्यावर कर सूट मिळते.
आयटीआर फाइल करताना काय काळजी घ्यावी?
आयटीआर फाइल करताना तुम्ही काळजी घ्यायची आहे. तुम्ही जास्त उशिरा आयटीआर फाइल करु नका अन्यथा अनेक अडचणी येऊ शकतात.
कोणत्या पद्धतीने कर वाचवू शकतात?
तुम्ही एनपीएस, ईपीएफमध्ये गुंतवणूक करुन कर वाचवू शकतात. याचसोबत तुम्ही जर घर भाड्याने दिले तरदेखील कर वाचवू शकतात.
आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय?
आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे. त्यामुळे त्याआधी आयटीआर फाइल करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.