
पोस्ट ऑफिसची NSC योजना ५ वर्षांत हमीदार परतावा देते आणि करसवलतही मिळते.
नवरा-बायकोने संयुक्त खाते उघडून ९ लाख गुंतवल्यास १३ लाख मिळू शकतात.
या योजनेत कमी जोखीम, सरकारी हमी आणि कर वाचवण्याची सुविधा आहे.
खातेदार बँकेत NSC गहाण ठेवून कर्ज घेऊ शकतात
सुरक्षितपणे पैसे गुंतवणूक करून चांगला परतावा मिळावा यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजनांकडे पाहिले जाते. नागरिकांकडून पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे पोस्ट ऑफिस नागरिकांसाठी वेगवेगळ्या आणि नवनवीन योजना आणत असते. या पैकीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना. ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही सुरक्षितपणे पैसे गुंतवून चांगले व्याज मिळवू शकता. ही एक सरकारी हमी योजना आहे. जी ५ वर्षात पूर्ण होते.
जर तुम्हाला निवृत्तीनंतर जमीन विकून किंवा इतर कोणत्याही मार्गाने एकरकमी रक्कम मिळाली असेल तर तुमच्यासाठी ही योजना गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. या योजनेत, तुम्हाला कमी जोखमीसह निश्चित परतावा मिळू शकतो. तुम्ही देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये केवायसी आणि आवश्यक कागदपत्रे देऊन या योजनेसाठी पैसे गुंतवणूक करण्यासाठी खाते उघडू शकता.
या योजनेत कोणीही गुंतवणूक करू शकतो. तुम्ही एकटे खाते उघडू शकता किंवा जास्तीत जास्त ३ प्रौढ व्यक्ती एकत्र होऊ शकतील असे संयुक्त खाते उघडू शकता. जर तुमची मुले १० वर्षांपेक्षा जास्त वयाची असतील तर ते स्वतः खाते उघडू शकतात. अल्पवयीन किंवा मानसिक आजारी व्यक्तीसाठी त्यांचे पालक खाते उघडू शकतात. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा अल्पवयीन व्यक्तीला नॉमिनी देखील बनवू शकता. महत्वाचे म्हणजे, या योजनेत तुम्ही तुम्हाला हवे तितके खाते उघडू शकता.
या योजनेत किमान गुंतवणूक १००० रुपयांपासून सुरू होते आणि पैसे गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. म्हणजेच तुम्ही तुम्हाला हवे तितके पैसे खात्यात जमा करू शकता. या योजनेत केलेली गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत ते कर सवलतीस पात्र आहे. एका आर्थिक वर्षात १.५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त आहे.
सध्या या योजनेत ७.७ टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज मिळते. ५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर व्याज दिले जाते. पहिल्या ४ वर्षांचे व्याज पुन्हा गुंतवले जाते. ज्यावर कर सूट उपलब्ध आहे. पण ५ व्या वर्षाचे व्याज करपात्र आहे. जर नवरा-बायको दोघेही नोकरी करत असतील तर या योजनेत संयुक्त खाते पोस्ट ऑफिस उघडून तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो. जर तुम्ही दोघांनी मिळून ९ लाख रुपये एकरकमी गुंतवले तर ५ वर्षांनी तुम्हाला १३,०४,१३० रुपये मिळतील. यापैकी ४,०४,१३० रुपये व्याज म्हणून मिळतील.
कमी जोखीम आणि सरकारी हमीसह चांगले परतावे मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ही योजना उत्तम पर्याय मानली जात आहे. ही पोस्ट ऑफिस योजना केवळ सुरक्षित नाही तर कर वाचविण्यास देखील मदत करते. या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही तुमचे एनएससी बँक किंवा एनबीएफसीमध्ये गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. गरज पडल्यास तुम्ही तुमची बचत न मोडता पैशांची व्यवस्था करू शकता. खाते ५ वर्षांत मॅच्युअर होते. हे खाते वेळेपूर्वी बंद करता येत नाही. हे फक्त गुंतवणूकदाराचा मृत्यू किंवा न्यायालयाचा आदेश यासारख्या विशेष प्रकरणांमध्येच होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.