Income Tax Return: सोशल मीडियावर कमाई करणाऱ्यांना किती द्यावा लागतो टॅक्स? कोणता ITR फॉर्म भरावा लागतो?

Social Media Income Tax Rules In India: युट्युब, इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळालेलं उत्पन्न हे करपात्र असतं. सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्सला आयकर भरावा लागतो. त्यांना कोणता ITR फॉर्म भरावा लागता ते जाणून घेऊ.
Social Media Income Tax Rules In India
Social media influencers must declare their online income and file the correct ITR form under Indian tax lawsaam Tv
Published On
Summary
  • सोशल मीडियावरून मिळालेलं उत्पन्नही करपात्र असून ते आयकरात समाविष्ट करावं लागतं.

  • युट्युबर, इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर, ब्लॉगर यांना ITR-3 किंवा ITR-4 फॉर्म भरावा लागतो.

  • उत्पन्नाच्या स्लॅबनुसार कर रक्कम ठरते; ₹2.5 लाखांपर्यंत कर माफ आहे.

  • उत्पन्न लपवणं गुन्हा असून आयकर विभाग डिजिटल पेमेंट्स आणि बँक डेटा तपासतो.

भारतात सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएंसरची संख्या वाढलीय. आयकर विभागाच्या मते, गेल्या दोन वर्षांत वार्षिक २० लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची संख्या खूप वाढलीय. काही इन्फ्लुएंसरची कमाई वर्षाला २ ते ५ कोटीच्या घरात आहे. सोशल मीडियावर इतकी मोठी कमाई करणाऱ्यांना किती कर भरावा लागतो. त्यांना कोणता आयटीआर फॉर्म लागतो? असे प्रश्न अनेकांना पडली आहेत.

टॅक्ससाठी बदलण्यात आले नियम

आयकर विभागाने आयटीआर-३ आणि आयटीआर-४ फॉर्ममध्ये मोठा बदल केलाय. त्यामध्ये पाच व्यावसायिक श्रेणी जोडल्या आहेत. यामध्ये यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया, सट्टेबाजी व्यवसाय, कमिशन एजंट आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडर्समधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश करण्यात आलाय. दरम्यान आतापर्यंत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर किंवा शेअर बाजारातील व्यावसायिक आधी आयकर रिटर्न भरण्यासाठी इतर कॅटेगरी निवडत होते. त्यामुळे कर भरणारा व्यक्ती कोणत्या पेशेत व्यवसाय करतोय हे ओळखणं कठीण होते.आता त्यांना एक खास कोड देण्यात आलाय. त्यामुळे त्याची ओळख लगेच होईल.

यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावरून कमाई करणाऱ्यांना आयकर विभागाने १६०२१ हा कोड दिलाय. प्रमोशन, डिजिटल कंटेंट किंवा जाहिरातींमधून कमाई करणाऱ्यांना हा कोड देण्यात आलाय. ज्याचा आयटीआर-३ आणि आयटीआर-४ दोन्ही फॉर्ममध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. सोशल मीडियावरून कमाई करणाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या पातळीनुसार आणि अंदाजे करानुसार आयटीआर ३ किंवा आयटीआर ४ दाखल करावे लागणार आहे.

Social Media Income Tax Rules In India
EPFO चा मोठा निर्णय; पीएफ खात्यात एकही पैसा नसला तरी EDLI मधून मिळतील ५०,०००रुपये

जर समजा एखाद्या इन्फ्लुएंसरने अनुमानित कर आकारणी अंतर्गत कलम ४४ADA चा पर्याय निवडला तर त्याला ITR-४ दाखल करावे लागेल. तर शेअर बाजारातून कमाई करणाऱ्या फ्युचर्स ऑप्शन्स (F&O) विभागातील व्यापाऱ्यांसाठी २१०१० हा नवीन कोड देण्यात आलाय. हा कोड त्यांच्या व्यापारातून होणाऱ्या कमाईची अचूक माहिती सुनिश्चित करेल. ट्रेडर्ससाटी आयटीआर-३ भरून त्यांना पूर्ण उत्पन्न आणि नुकसानाची माहिती द्यावी लागेल.

Q

सोशल मीडिया वरून मिळालेल्या उत्पन्नावर कर लागू होतो का?

A

होय, युट्युब, इन्स्टाग्राम, किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळालेलं उत्पन्न हे करपात्र असतं आणि त्यावर आयकर भरावा लागतो.

Q

कोणता ITR फॉर्म सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी भरावा?

A

उत्पन्नाच्या स्वरूपावर अवलंबून, ITR-3 किंवा ITR-4 हा फॉर्म भरावा लागतो. जर व्यवसाय स्वरूपात उत्पन्न असेल, तर ITR-3 योग्य ठरतो.

Q

सोशल मीडिया कमाईवर किती टक्के कर भरावा लागतो?

A

उत्पन्नाच्या रकमेवर आधारित स्लॅबप्रमाणे कर आकारला जातो.

Q

या उत्पन्नाची माहिती आयकर विभागाला कशी मिळते?

A

जर क्रिएटरने फॉर्म 26AS आणि AIS चेक केलं, तर तिथे त्यांच्या डिजिटल पेमेंट्स आणि बँक व्यवहारांमधून आयकर विभागाला माहिती मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com