
आयकर विभागाच्या नियमांत मोठा बदल
आयटीआर रद्द झाला तर दोन वर्षात पुन्हा तपासला जाणार
दोन वर्षात करदात्यांना मिळणार रिफंड
आयटीआर फाइल करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ज्या करदात्यांना आयटीआर काही कारणांनी रद्द करण्यात आला आहे त्यांना दिलासा मिळाला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे या करदात्यांचे आयटीआर रद्द केले जातात. परंतु आता त्यांना पुन्हा दोन वर्षांसाठी रिटर्न फाइल करता येतील.
या नवीन नियमांनुसार, ३१ मार्च २०२४ पर्यंत फाइल केलेले आयटीआर जे रद्द करण्यात आले आहे त्यांना आता दोन वर्षांसाठी प्रोसेस केले जातील. म्हणजेच आता हे रिटर्न ३१ मार्च २०२६ पुन्हा तपासले जाणार आहेत आणि प्रोसेस केले जातील.
आयकर विभागाने दिला दिलासा (Income Tax Department New Rule)
आयकर विभागाच्या या निर्णयामुळे अनेक करदात्यांना फायदा होणार आहे. जे करदाते रिफंडच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना दिलासा मिळणार आहे. अनेक करदात्यांना काही तांत्रिक कारणांमुळे रिफंड आलेला नाही. आता आयकर विभाग या करदात्यांचा आयटीआर पुन्हा एकदा तपासणार आहे आणि करदात्यांना याबाबत माहिती देणार आगे.
या नवीन निर्णयामुळे रिफंड मिळणे सोपे होणार आहे. याचसोबत जर तुम्हाला कोणतेही व्याज मिळणार असेल तर तेदेखील मिळणार आहे. दरम्यान, ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. जर तुम्ही आधार-पॅन लिंक केले नसेल तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही.
या करदात्यांना होणार फायदा (These Taxpayers Get Benefit)
या नियमांमुळे ज्या करदात्यांना फायदा होणार आहे ज्यांनी ३१ मार्च २०२४ पूर्वी आयटीआर फाइल केला आहे. परंतु त्यांचा रिटर्न काही कारणांनी बाद करण्यात आला. यामुळेच आयटीआर योग्य वेळी फाइल करण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरुन काही अडचण आली तर ती दूर करता येईल.
आयटीआर रद्द केला तर काय करावे?
आता करदाते आपला आयटीआर पुन्हा फाइल करू शकतात आणि तो ३१ मार्च २०२६ पर्यंत प्रोसेस होईल.
कोणत्या करदात्यांना याचा फायदा होणार आहे?
ज्या करदात्यांचा आयटीआर ३१ मार्च २०२४ पूर्वी फाइल झाला होता पण तांत्रिक कारणांमुळे नाकारला गेला, त्यांना याचा फायदा होईल.
आधार-पॅन लिंक करणे आवश्यक आहे का?
होय, आयटीआर प्रोसेस करण्यासाठी आधार आणि पॅन लिंक असणे बंधनकारक आहे.
ही प्रक्रिया कधीपर्यंत सुरु असणार आहे?
ही प्रक्रिया ३१ मार्च २०२६ पर्यंत सुरु राहणार आहे. दोन वर्षामध्ये तुमच्या आयटीआरची प्रोसेस पूर्ण होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.