ITR Filling 2025: बायकोला रोख रक्कम देताय, कापला जाईल टॅक्स, आयकर नियम काय सांगतात? वाचा सविस्तर

ITR Filling 2025 Rules: तुम्ही जर पत्नीला रोख रक्कम देत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
ITR Filling 2025
ITR Filling 2025Saam Tv
Published On

सध्या आयटीआर भरण्यास सुरुवात झाली आहे. अनेक करदाते इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात किंवा कॅशमध्ये व्यव्हार करतात. परंतु जर तुम्ही तुमच्या पत्नीला कॅशमध्ये पैसे देत असाल किंवा बँक ट्रान्सफर करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी.

इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार, हे पैसे तुमच्या उत्पन्नात मोजले जाते. आणि यामुळे तुम्हाला टॅक्स नोटीस येऊ शकते. यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

तुम्हाला इन्कम टॅक्सचे काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहेत. जरी तुम्ही तुमच्या बायकोला कॅशमध्ये पैसे देत असाल तरीही तुम्हाला नोटीस येऊ शकते.

क्लबिंग ऑफ इन्कम नियम

आयकर नियमाअंतर्गत कलम 269SS और 269T चे पालन करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या पत्नीला घरखर्चासाठी किंवा गिफ्ट म्हणून रोख पैसे देतात. त्यावर टॅक्स लागणार नाहीये. ही रक्कम पतीच्या उत्पन्नात ग्राह्य धरली जाते. मात्र जर तुमची बायको हे पैसे वापरुन गुंतवणूक (एफडी, शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टी) खरेदी करत असाल तर हे उत्पन्नात मानले जाते.यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. ही रक्कम क्लबिंग ऑफ इन्कम नियमाअंतर्गत तुमच्या उत्पन्नात जोडली जाते.

ITR Filling 2025
Income Tax Notice : १० हजार रुपये महिन्याने दुकानात काम, आयकर विभागाची कामगाराला १५ कोटींची नोटीस

कलम 269SS आणि 269T काय आहे?

कलम 269SS आणि 269T अंतर्गत रोख रक्कमेचे व्यव्हार रेग्युलेट केले आहेत जेणेकरुन काळा पैशांवर आळा घातला जाईल.कलम 269SS अंतर्गत कर्ज, ठेव किंवा आगाऊ रक्कम २०,००० पेक्षा जास्त स्विकारण्यास मनाई आहे. जर पतीने पत्नीला २०००० रुपये दिले तर ति बॅकिंगद्वारे म्हणजे चेक, एनईएफटी, आरटीजीएसद्वारे केली पाहिजे. कलम 269T अंतर्गत जर २०,००० पेक्षा जास्त कर्ज परत करायचे असेल तर तेदेखील बँकेद्वारे करायला हवे. पती-पत्नीसाठी या कलमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड नाही परंतु पारदर्शकता महत्त्वाची आहे.

ITR Filling 2025
Tax Saving: या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा, मिळेल टॅक्सपासून सूट आणि जास्तीत जास्त परतावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com