Mutual Funds च्या गुंतवणुकीमुळे मिटेल आर्थिक चणचण; झटपट मिळेल कर्ज, किती अन् कसं मिळेल Loan?

Mutual Funds Loan: जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल आणि जर चांगला निधी तयार झाला तर तो तारण ठेवून कर्ज मिळू शकते. म्युच्युअल फंड तारण ठेवून घेतलेल्या कर्जाचा व्याजदर कमी असतो.
Mutual Funds Loan
Loan against Mutual Fundsaam tv
Published On

आयुष्यात बऱ्याचदा अशा अडचणी येतात जेव्हा तुम्हाला इतरांकडून पैसे घ्यावे लागतात किंवा कर्जाची गरज असते. वैयक्तिक (पर्सनल) कर्ज, सोने कर्ज किंवा इतर कोणत्याही पर्याय असो, त्यात तुम्हाला भरपूर व्याज द्यावे लागते. प्रक्रिया शुल्क आणि कागदपत्रांच्या इतर अडचणी तर आहेतच. याशिवाय जर कर्ज वेळेपूर्वी परत केले नाही तर दंडदेखील आकारला जातो.अशा परिस्थितीत, म्युच्युअल फंड खूप फायद्याचा ठरेल. म्युच्युअल फंडातून कमी वेळात आणि कोणतीही अडचण नं येता कर्ज मिळते. ( Loan against Mutual Fund know the Process)

जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल. जर चांगला फंड तयार झाला असेल, तर तुम्ही तो फंड गहाण ठेवून कर्ज मिळवू शकता. म्युच्युअल फंड गहाण ठेवून घेतलेल्या कर्जाचा व्याजदर कमी असतो. सहसा या प्रकारच्या कर्जाचा व्याजदर ९ ते ११% असतो. जर तुम्ही वेळेपूर्वी कर्ज फेडले तर तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही. तुम्ही कर्ज घेईपर्यंत तुमचा म्युच्युअल फंड नफ्यात राहील.

म्युच्युअल फंडांवर कर्ज कसे मिळवायचे?

कोणतीही बँक किंवा बिगर-बँकिंग वित्तीय संस्था तुमच्या इक्विटी म्युच्युअल फंडाची स्थिती आणि स्थिती पाहून कर्ज देते. यामध्ये, तुमच्या म्युच्युअल फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य पाहिले जाते. तुम्हाला मिळणारी जास्तीत जास्त कर्ज रक्कम तुम्ही कोणत्या मार्केट स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे आणि किती यावर अवलंबून असते. एसबीआय डेट म्युच्युअल फंडांवर ८५% पर्यंत कर्ज देते. तर अ‍ॅक्सिस बँक ७५% पर्यंत कर्ज देते.

सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडांवर कर्ज मिळते का?

प्रत्येक म्युच्युअल फंडावर कर्ज उपलब्ध नाही. जर तुम्ही म्युच्युअल फंडावर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुमच्या बँकेकडून त्याबद्दल माहिती मिळून घ्या. एसबीआय फक्त त्यांच्या स्वतःच्या म्युच्युअल फंड योजनांवर कर्ज देते. काही बँका इक्विटी फंडांच्या लार्ज किंवा स्मॉल कॅप स्टॉकवर आधारित कर्ज देत असतात.

Mutual Funds Loan
UPI Cash Deposit: कॅश डिपॉजिट कराचीय, पण बँकेच्या गर्दीचं टेन्शन आलंय? UPI मिटवेल चिंता, जाणून घ्या पैसे जमा करण्याची प्रक्रिया

तुम्हाला किती व्याज द्यावे लागेल?

वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत म्युच्युअल फंडावर कर्ज घेणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जर आपण त्यांच्या व्याजदरांची तुलना केली तर, एसबीआयच्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर ११.००% पासून सुरू होतो, तर एसबीआयच्या म्युच्युअल फंड कर्जावरील व्याजदर ८.५०% पासून सुरू होतो

Mutual Funds Loan
Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

कर्ज कसे मिळेल?

अनेक ठिकाणी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा मिळते. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. यामुळे तुम्हाला कर्ज लवकर मिळण्यास मदत होते. आयसीआयसीआय बँक म्युच्युअल फंडांवर त्यांच्या निवडक ग्राहकांना प्री- अप्रूव्ड कर्ज सुविधा देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com