
आता तुम्ही थेट आयकर वेबसाइटला भेट देऊन आयटीआर-3 ऑनलाइन भरु शकता. आयकर विभागाने ३० जुलै २०२५ रोजी एक नोटीस जारी केली आणि माहिती दिली की आता आयटीआर - ३ फॉर्म ऑनलाइन भरण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. या निर्णयानंतर शेअर बजारात व्यापार करणाऱ्यांना थेट आयकर वेबसाइटला भेट देऊन आयटीआर ३ फॉर्म ऑनलाइन भरु शकतात. आयकर विभागाने आज ३० जुलै रोजी याची घोषणा केली आहे.
व्यवसायात नफा किंवा तोटा झालेल्या व्यक्ती आणि एचयूएफसाठी आयटीआर ३ फॉर्म लागू आहे. फॉर्म विशेष आहे. कारण तो व्यापक किंवा मास्टर फॉर्म म्हणून ओळखला जातो. ज्यामध्ये एकाच ठिकाणी अनेक प्रकारच्या उत्पन्नाची नोंद करणे शक्य आहे.
1 तुम्ही हे शेअर ट्रेडिंग किंवा एफ अॅंड ओमधून मिळणारे उत्पन्न बनवतात.
2. अनलिस्टेड इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे भरु शकतात.
3.फर्ममध्ये भागीदार म्हणून उत्पन्न
4. पगार, पेन्शन, घर मालमत्ता किंवा इतर स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न.
5.ज्यांचे एकूण उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त आहे.
ITR भरण्यासाठी तुमचं PAN कार्ड आणि Aadhaar कार्ड लिंक असणं आवश्यक आहे. पुढे incometax या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. पुढे लॉगिन करा. तुमचा पॅन नंबर वापरुन यूजर आयडी म्हणून लॉगिन करा. जर पासवर्ड विसरलात तर forgot password वापरुन reset करु शकता. सध्या सामान्य लोकांसाठी ITR-3 हा फॉर्म असतो. जर तुम्ही फक्त पगार आणि बँक व्याजावर आधारित उत्पन्न कमावत असाल, तर ITR-1 फॉर्म योग्य असतो. तो तुम्ही भरायचा असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.