Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रात सुर्य उगवतो मावळतो पुन्हा उगवतो पुन्हा मावळतो. हे सगळ्यांना माहितच असेल.
महाराष्ट्रात जशी रात्र दिवस होतो. तसेच काही देशात फक्त दिवस असतो. तिथे सुर्य मावळत नाही. रात्र होत नाही. याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
आर्क्टिक सर्कलजवळ असलेले जे देश असतात. तिथे उन्हाळ्यात सूर्य अनेक दिवस मावळत नाही. कारण सूर्य पृथ्वीच्या अक्ष २३.५ अंशांनी झुकतो. त्यामुळे २४ तास त्याचा उजेड सर्वत्र असतो.
नॉर्वे या देशामध्ये मे ते जुलै या महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच ७६ दिवस सुर्य मावळत नाही.
स्वालबार्डमध्ये फक्त ४० मिनिटांची रात्र असते. त्यामुळे त्याला 'मध्यरात्रीच्या सुर्याची भूमी' म्हणतात.
फिनलंडमध्ये मे ते जुलै असे ७३ दिवस रात्र होत नाही. आइसलॅंडमध्ये १० मे ते जुलै या काळात सूर्य मावळतच नाही. हे युरोपचे सगळ्यात मोठे बेट आहे.
कॅनडाच्या उत्तरेकडील प्रदेशात उन्हाळ्यात ५० दिवस सूर्य मावळत नाही. अलास्कामध्ये सूर्य मे ते जुलै या काळात मावळत नाही.
स्वीडनच्या उत्तरेकडील भागात, किरुना आणि अबिस्को, मे ते ऑगस्ट या दिवसात रात्र होत नाही. रशियाच्या उत्तरेकडील भागात मे ते जुलै या कालावधीत सुर्यप्रकाश २४ तास असतो.
NEXT : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य