ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling: आयटीआर फाइल करण्यास सुरुवात; जुनी की नवी करप्रणाली, तुमच्यासाठी कोणती फायदेशीर? वाचा सविस्तर

New Vs Old Tax Regime: आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. आयटीआर फाइल करताना तुम्हाला जुनी किंवा नवीन कर प्रणाली निवडणे खूप गरजेचे आहे.

Siddhi Hande

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. पगारदाते आता आयटीआर फाइल करण्यासाठी सुरुवात करतील. परंतु आयटीआर फाइल करताना योग्य टॅक्स रिजीम निवडणे हे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार योग्य स्लॅब निवडला तर तुम्हाला अनेक फायदे होतील. टॅक्स वाचवण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तुम्हाला (सेक्शन 80C, 80D, 80G) अंतर्गत सूट मिळते.

आयटीआर फाइल करण्यासाठी दोन पर्याय

जुना टॅक्स स्लॅब तुम्हाला अनेक सूट मिळवून देते. यामध्ये बचत योजनेत गुंतवणूक, इन्श्युरन्स, होम लोन इंटरेस्ट तसेच ट्रॅव्हल अलाउंसवर टॅक्स बेनिफिट मिळते. या योजनेत तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागत नाही.

नवीन टॅक्स स्लॅब (New Tax Regime)

वर्षाला ४ रुपये उत्पन्नासाठी कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. ४ लाख ते ८ लाख रुपयांपर्यंत 5% टक्के टॅक्स भरावा लागेल.८ लाख ते १२ लाखांच्या उत्पन्नावर १० टक्के तर १२ लाख ते १६ लाखांच्या उत्पन्नावर १५ टक्के, १६ लाख ते २० लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के टॅक्स भरावा लागेल. २० लाख ते २४ लाखांवर २५ टक्के टॅक्स भरावा लागेल.

१२ लाखांचे उत्पन्न टॅक्स फ्री

नवीन टॅक्स स्लॅबमध्ये १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स भरावा लागणार आहे. याचसोबत पगारदार वर्गाला ७५ हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शनचादेखील फायदा होणार आहे. म्हणजेच तुम्हाला १२. ७५ लाखांवर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही.

नवीन कर प्रणालीचे फायदे

नॅशनल पेन्शन स्कीम, पेन्शन फंडमधील गुंतवणूकीवर टॅक्सपासून सूट मिळते. नवीन कर्मचाऱ्यांवर भरतीसंबंधित सूट मिळते. अग्नीवीर कॉर्पस फंडमध्ये गुंतवणूक केल्यावरदेखील सूट मिळते.

जुना टक्स स्लॅब (Old Tax Regime)

जुन्या कर प्रणालीत २.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. २.५ लाख ते ५ लाखांवर ५ टक्के, ५ लाख ते १० लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के तर १० ते ५० लाखांच्या उत्पन्नावर ३० टक्के टॅक्स भरावा लागेल.

जुन्या कर प्रणालीचे फायदे

जुन्या कर प्रणालीत तुम्हाला गुंतवणूकीवर टॅक्सपासून सूट मिळते. LIC, PPF, EPF, ELSS या योजनेत गुंतवणूकीवर टॅक्स सूट मिळते. तसेच हेल्थ इन्श्युरन्सवरदेखील सूट मिळते. दिव्यांग, डोनेशनवर सूट मिळते. तसेच ८ लाखांपर्यंतच्या एज्युकेशन लोनवर टॅक्स सूट मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

SCROLL FOR NEXT