Shreya Maskar
हिवाळ्यात आवर्जून जोडीदारासोबत दीव-दमणला थेट द्या.दीव आणि दमण हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेले केंद्रशासित प्रदेश आहेत.
दमण गुजरातच्या मुख्य भूमीवर आहे, तर दीव हे गुजरातच्या किनाऱ्याजवळ असलेले एक बेट आहे.
दीव-दमणमध्ये समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि चर्च आढळतात. येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
दमण आणि दीव येथे गुजराती आणि पोर्तुगीज संस्कृतींचा संगम पाहायला मिळतो. आयु्ष्यात एकदा तरी येथे भेट द्या.
दमण आणि दीवमध्ये जामपोर बीच, देवका बीच, दीव किल्ला, मोती दमण किल्ला आणि नायडा लेणी यांसारखी अनेक पर्यटन स्थळे आहेत.
नायडा लेणी ही एक गुंफा आहे. जी पर्यटकांना आकर्षित करते. तुम्ही दीव-दमणला गेल्यावर येथे आवर्जून फिरायला जा.
दीव-दमणमध्ये जामपोर बीच आणि देवका बीच यांसारख्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेऊ शकता.
दमण आणि दीवमध्ये मोठी दमण किल्ला आणि दीव किल्ला यांसारखे जुने किल्ले आहेत, जे पोर्तुगीज काळातील आहेत.