Shreya Maskar
भुदरगड किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात वसलेला आहे. हा किल्ला भुदरगड तालुक्यात, गारगोटी जवळ आहे.
भुदरगड किल्ला शिलाहार राजा भोज दुसऱ्याने बांधला होता. भुदरगड किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
शिवाजी महाराजांनी भुदरगड किल्ल्याचे नूतनीकरण केले आणि महत्त्वाची लष्करी चौकी बनवले, ज्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील खिंडी आणि व्यापारी मार्ग सुरक्षित राहिले.
भुदरगड किल्ला जांभ्या दगडांमधील तटबंदी आणि दोन प्रवेशद्वारांसाठी ओळखला जातो. गडाची तटबंदी आता जांभ्या दगडांमध्ये नव्याने बांधण्यात आली आहे.
भुदरगड किल्ल्यावरील सह्याद्री पर्वताचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. तुम्ही येथे फोटोशूट देखील करू शकता.
भुदरगड किल्ल्यावर ट्रेकिंग करता येते. ट्रेकिंग करताना आवश्यक ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून ट्रेक मस्त होईल.
कोल्हापूरला गेल्यावर पन्हाळा किल्ला, विशालगड किल्ला, महालक्ष्मी मंदिर, न्यू पॅलेस संग्रहालय यांसारख्या ठिकाणांना भेट द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.